पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात घेतलेल्या तपासणी मोहिमेत गावठी दारू व हातभट्टी तयार करण्यासाठीचे रसायन, वाहने असा तब्बल ६ कोटी ५७ लाख ४ हजार ८७८ रुपयांचा ऐवज एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत जप्त केला आहे. या प्रकरणी १ हजार ४७५ आरोपींवर कारवाई करण्यात आली.गावठी दारूच्या विषबाधेच्या अनेक घटना राज्यांत यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. या प्रकाराला आळा बसावा, यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने वर्षभर मोहीम राबविण्यात येते. त्यात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ हजार ५७० कारवायांमध्ये १ हजार ४५७ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, २०९ वाहने जप्त केली. असा एकूण ६ कोटी ५७ लाख रुपयांचा ऐवज या कारवाईत जप्त केला आहे.उत्पादन शुल्क विभागाने २०१६-१७ (एप्रिल ते डिंसेंबर) या वर्षांत २ हजार ५६८ कारवायांमध्ये १ हजार ३८८ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यात २२२ वाहने आणि इतर ऐवज असा ६ कोटी ३६ लाख ९१ हजार ७९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. उत्पादन शुल्क विभागाने नववर्ष दिनानिमित्त केलेल्या कारवायांत २८ ते ३० डिसेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविली होती. त्यात ४८ हजार लिटर रसायन आणि दारू जप्त करण्यात आली. या कारवायात दौंड तालुक्यातील बोरी ऐंदी, कासुर्डी, भांडगाव, चौफुला, वाखारी, बावीस फाटा, खुटबाव, पूर्व हवेली तालुक्यातील ढेरे, हांडेवाडी, औताडेवाडी, वडकी, लोणी काळभोर, सिद्रामळा, तरडेगाव येथील गावठी दारूच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. येथून २ हजार २७५ लिटर दारु, ४५ हजार ४०० लिटर हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन व इतर साहित्य असा ११ लाख ८ हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.पावणेचार लाख मद्य परवान्यांचे वितरणडिसेंबर महिन्यात एक दिवसाच्या ३.७१ लाख मद्य परवान्यांचे जिल्ह्यात वितरण झाले. दिवसासाठी मद्य वितरणासाठी (इव्हेंट) २७५ जणांनी परवाने घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त अधीक्षक सुनील फुलफगर यांनी दिली.कोरेगाव पार्क, बाणेर परिसरातील हॉटेल, पब्जवर कारवाईपुणे : मुंबर्ई हॉटेल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पुण्यातील कोरेगाव पार्क व बाणेर परिसरातील हॉटेल्स, पब्जवर कारवाई करण्यात आली. हॉटेलमालकांनी केलेले बेकायदेशीर व जास्तीचे बांधकामे पाडून टाकण्यात आली. मुंबईतील लोअर परळ भागातल्या कमला मिल इथे गुरुवारी (२८ डिसेंबर) रात्री उशिरा लागेल्या आगीत एक हॉटेल भस्मसात झाले. या दुर्घटनेत तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हॉटेल, पब्ज, रेस्टॉरंटवरदेखील कारवाई करण्याची मागणी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी (दि.१) कोरेगाव पार्क व बाणेर परिसरातील हॉटेलवर कारवाई केली. यामध्ये १६ हॉटेलमधील तब्बल १४ हजार चौ.मीटर अनधिकृत बांधकाम पाडून टाकले़
दीड हजार जणांवर कारवाईचा बडगा, बेकायदा मद्यविक्री, साडेसहा कोटींचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 3:28 AM