पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पुणे कॅन्टोन्मेंटमधुन रमेश बागवे यांना तर शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांच्या विरूध्द रमेश बागवे, तर शिवाजीनगरमध्ये भाजपचे आमदार सिध्दार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट यांच्यात लढत होणार आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी कॉग्रेसकडे कसबा, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा समावेश आहे. कॉग्रेसने यापुर्वी कसबामधुन रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कॉग्रेसने उमेदवारची चौथी यादी जाहीर केली. त्यात 14 उमेदवारांचा समावेश आहे.
पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये कॉग्रेसने रमेश बागवे यांना तर शिवाजीनगरमधुन दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी दुरंगी लढत होणार आहे.
बाहेरच्या व्यक्तीला दिली नाही उमेदवारी
शिवाजीनगर मतदार संघामध्ये बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नका . आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या. अशी भूमिका पक्षातील इच्छुकांनी घेतली होती. शिवाजीनगरच्या उमेदवारीवरून काँग्रेस भवनांमध्ये शनिवारी वादही झाले होते या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने शिवाजीनगर मध्ये दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर केली आहे
आठ विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील पुणे कॅन्टोन्मेंट ,शिवाजीनगरमध्ये कॉग्रेसचे उमेदवार जाहीर होणे बाकी होते. पण या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाल्यामुळे आठही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने दिले जूनेच चेहरे
गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसेने पुणे कॅन्टोन्मेंट ,शिवाजीनगर, आणि कसबा पोटनिवडणुकीत अनुक्रमे रमेश बागवे, दत्ता बहिरट, रविंद्र धंगेकर उमेदवार होते. याच उमेदवारांवर विश्वास दाखवत कॉग्रेसने या विधानसभा निवडणुकीत याच जुन्या चेह०यांना संधी दिली आहे.