पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी तरुणाचा जामिन फेटाळला. निखील श्रीकांत गोडसे पाटील (रा. नºहे) असे जामिन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात आकाश प्रशांत वाघ (वय २२, रा. दत्तनगर) याला अटक करण्यात आली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर अथर्व राहुल राजे (वय १८, रा. हिंगणे खुर्द) याच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना धनकवडी भागातील एका बंगल्यात ११ मार्च ते ५ आॅगस्ट २०१७ या कालावधीत घडली. पीडित मुलगी ही अथर्व याची वर्ग मैत्रीण होती. अथर्व याने मामेभाऊ आकाश याला फिर्यादीच्या संपर्कात आणले. आकाश याने फिर्यादीला फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अथर्व याचा मामेभाऊ असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघे सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होते. नंतर भेटणे सुरू झाले. दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबतची माहिती आकाश याने मित्र निखील याला दिली. त्यानंतर निखील याने पीडित मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने त्यास नकार दिला. त्यानंतर तिचे आकाश सोबत असलेल्या संबंधाची माहिती आई-वडिलांना कळवण्याची आणि त्याच्याकडे तिचे अश्लील फोटो आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला अथर्व याच्या आजोबाच्या बंगल्यावर बोलावले. त्यावेळी अथर्व याच्या उपस्थितीत निखील आणि आकाश या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी फिर्यादी तेथून निघून गेली. त्यानंतर एका महिन्यांनी निखील आणि आकाश या दोघांनी शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी फिर्यादिला दिली. या प्रकारामुळे फिर्यादीने घरी जावून वेगवेगळ्या औषधांच्या गोळ्या सेवन केल्या. त्यानंतर रुग्णालयात उपचार केल्यानंतर फिर्यादीच्या घरी ही घटना कळली. या प्रकरणात पोलिसांनी निखील आणि आकाश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. निखील याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. निखील मुख्य आरोपी आहे. त्याने सामूहिक बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केला आहे. ज्याची कमीत कमी शिक्षा २० वर्षे आहे.
अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी तरुणाचा जामिन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 3:15 PM
सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी तरुणाचा जामिन फेटाळला. या प्रकरणात आकाश वाघ (वय २२) याला अटक करण्यात आली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर अथर्व राजे (वय १८) याच्यावरही गुन्हा दाखल आहे.
ठळक मुद्दे ही घटना धनकवडी भागातील एका बंगल्यात ११ मार्च ते ५ आॅगस्ट २०१७ या कालावधीत घडली. पोलिसांनी निखील आणि आकाश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.