पुणे : शहरात कोरोनाची दुसरी लाट १३ फेब्रुवारीपासून सुरू झाली, तेव्हा शहरात १ हजार २५० सक्रिय रूग्ण होते,़ पण आता ५० दिवसांनी ही संख्या ४६ हजाराच्या पुढे गेली आहे़ परंतु यापैकी ३९ हजार रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरणात) आहेत. सध्या साधारणत: साडेसहा हजार रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत असून, यापैकी ४ हजार रूग्णांवर आॅक्सिजनसह तर ५५० रूग्णांवर व्हेंटिलेटरसह उपचार सुरू आहेत़ तरीही सद्यस्थितीला शहरात ४०० आॅक्सिजन बेड शिल्लक असून, येत्या दोन दिवसात व्हेंटिलेटरची संख्याही ६१० पर्यंत नेण्यात येणार आहे़, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली़
ते म्हणाले, शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन महापािलकेने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे़ त्यानुसार, शहरातील ६ खाजगी रूग्णालये ७ एप्रिलपर्यंत १०० टक्के महापालिकेने कोरोनाबाधितांसाठी राखीव केली आहेत़ तर आज लष्कराच्या एआयसीटी मधील २० व्हेटिलेटर बेड व २० आॅक्सिजन बेडही महापालिकेला मिळाले आहेत़ दरम्यान येत्या दोन दिवसात १५० बेडचे बिबवेवाडी येथील ईएसआय रूग्णालयही महापालिका पूर्णपणे ताब्यात घेणार आहे़ पुढील काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, आणखी काही खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे नियोजन असून, रुग्णांना बेड कमी पडू दिले जाणार नाहीत याची खबरदारी महापालिका घेत असल्याचे कुमार यांनी सांगितले़
रेमडेसिविर या इंजेक्शनच्या पुरवठ्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाबरोबर चर्चा झाली असून, आज दोन हजार इंजेक्शनचा पुरवठा होणार असून, पुढील दोन दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात हे इंजेक्शन शहरात उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले़
----------------------
मास्क न वापरणाऱ्यांकडून १५ कोटी दंड वसुल
कोरोना संसर्गाच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही मास्क वापर न करणाऱ्यांची संख्या शहरात मोठी आहे़ यापैकी अधिकाºयांच्या निदर्शनास आलेल्यांकडून महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत १५ कोटी ७७ लाख रूपयांचा दंड वसुल केला आहे़ तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न केलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून ३० लाख रूपये दंड वसुल करण्यात आल्याची माहिती विक्रम कुमार यांनी दिली़
--------------------------