त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले,दोन मुली, भाऊ,पुतणे, जावई,सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा दूध संघाचे संचालक चंद्रशेखर शेटे, यांचे ते वडील होत. वाडा गावाचे माजी सरपंच रोहिदास शेटे यांचे बंधू होत. चासकमान धरणाच्या वेळी संपूर्ण गाव विस्थापित होत असताना सरपंच म्हणून बाळासाहेब शेटे यांनी पुढाकार घेऊन गावठाणासाठी जमीन खरेदी करुन गावाचे पुनर्वसन केल्याने पश्चिम भागातील वाडा गावची बाजारपेठेची ओळख कायम ठेवल्याचे मोलाचे श्रेय जाते. बाळासाहेब शेटे वाडा गावचे १९७४ ते १९९१ पर्यंत सलग सरपंच भूषविले. १९९२-९३ मध्ये वाडा गावठाण पर्यायी जागेत करुन मुख्यमंत्री शरद पवार यांना आणून उद्घाटन केले. १९९२-९७ या काळात खेड पंचायत समितीचे सभापतीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर तेव्हापासून पश्चिम भागाला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १९९३- २०१५ जिल्हा दूध संघाचे संचालक पदाबरोबर अध्यक्षपद भूषविले.
बाळासाहेब शेटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:08 AM