लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे आणि सभागृहनेते एकनाथ पवार यांनी दिली. ‘बाळासाहेबांचे तैलचित्र उभारणीचा कार्यक्रम लांबणीवर टाकावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. रविवारी दुपारी एकला होणाऱ्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते तैलचित्र अनावरण होणार आहे़ या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित राहतील. याविषयी पवार म्हणाले, ‘‘पालिकेच्या पहिल्या सभेत सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र उभारावे, असा ठराव झाला होता. ’’ बाळासाहेबांचे तैलचित्र सभागृहात लावावे, अशी मागणी शिवसेनेने केली. कार्यक्रम जाहीर करताना शिवसेनेच्या नेत्यांना विश्वासात घेतलेले नाही. भाजपाच्या या कृत्याचा मी निषेध करतो, कार्यक्रमात फेरबदल करून या कार्यक्रमास ठाकरे कुटुंबीयांना बोलवावे, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र बसविणार
By admin | Published: May 27, 2017 1:02 AM