निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 08:49 PM2020-02-21T20:49:26+5:302020-02-21T20:52:50+5:30

ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. अशावेळी थोरात यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. 

Balasaheb Thorat advice to those who changes party before the election, | निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की.... 

निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की.... 

Next

पुणे : लोकसभा आणि विशेषतः विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर पक्ष सोडून गेलेल्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सल्ला दिला आहे. ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. अशावेळी थोरात यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. 

पुण्यात काँग्रेस भवनमध्ये थोरात यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पक्षासह विविध विषयांवर आपली मते मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. एमआयएमच्या वारीस पठाण यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. मात्र त्यांना विखे पाटील यांच्या विषयीचा प्रश्न विचारल्यावर सुरुवातीला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. अखेर पुन्हा एकदा 'विखे पाटील' अस्वस्थ असल्याचे समजते असे विचारल्यावर थोरात यांनी सूचक उत्तर देत नाव घेण्याचे टाळले. 

थोरात म्हणाले की, 'लोकसभा हवा आली आणि आमच काही मंडळी भाजपमध्ये गेली. मी कोणा एकाचं नाव घेणार नाही. त्यात काही मित्र आहेत,त्यांना म्हटलं की, आता काही दिवस थांबा आणि अंतरंग बघून या'.एमआयएम बद्दल बोलताना ते म्हणाले की, 'ही भाजपची बी टीम आहे.समाजात विभाजन होत नाही हे पाहिल्यावर ही भाजपची नवी चाल आहे'. 

Web Title: Balasaheb Thorat advice to those who changes party before the election,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.