शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बालभारती वर्षभरात स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरु करणार : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 6:26 PM

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा व अभ्यासक्रमाबाबत येत्या १ फेब्रुवारीपासून तज्ज्ञ शिक्षकांकडून समुपदेशन...

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने इयत्ता चौथीचे वर्ग टप्प्या-टप्प्याने सुरू करणार

पुणे : बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे. तसेच बालभारतीतर्फे वर्षभरात स्वत: शैक्षणिक चॅनेल सुरू केला जाईल, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी केली. तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा व अभ्यासक्रमाबाबत येत्या १ फेब्रुवारीपासून तज्ज्ञ शिक्षकांकडून समुपदेशन करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संस्थेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त व किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,बालभारतीचे संचालक दिनकर पाटील,समन्वयक विवेक गोसावी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्लास पवार,कवी इंग्रजीत भालेराव आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाल्या, महापालिका,नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशासाठी रांगा लागतात,याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. तसेच राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात. शिक्षण विभागाने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व विषय शिक्षकांकडून या विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे.

कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवले. कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात जाऊन शिक्षण घेता आले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे यु-ट्युब-फेसबुक लाईव आदी साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेश करण्यासाठी 426 तज्ज्ञ समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.------------------------वर्षा गायकवाड यांनी वाचकांना विशेष भेट देत किशोरची वार्षिक वर्गणी केवळ 50 रुपये करण्याची घोषणा केली.तसेच वाचन संस्कृतीला चालना मिळावी,यासाठी बालभारतीने ग्रंथालय सुरू करावे,असे आदेश दिले. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने इयत्ता चौथीचे वर्ग टप्प्या-टप्प्याने सुरू केले जातील, असे सांगितले. त्याचप्रमाणे शाळांमधील उपस्थिती वाढवावी व शालाबाह्य विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावेत यासाठी स्वतंत्र मोहिम राबविली जाईल,असेही त्यांनी सांगितले.---------------

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याVarsha Gaikwadवर्षा गायकवाडSchoolशाळा