शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

बंदी असूनही बैलगाडा शर्यत

By admin | Published: April 13, 2016 3:36 AM

बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे रविवारी भिर्र्रर्र झाली. भैरवनाथ यात्रा-उत्सवानिमित्त येथे २५ नामवंत बैलगाडे धावले. विशेष म्हणजे

पुणे : बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे रविवारी भिर्र्रर्र झाली. भैरवनाथ यात्रा-उत्सवानिमित्त येथे २५ नामवंत बैलगाडे धावले. विशेष म्हणजे, लांडेवाडी हे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे गाव आहे. लांडेवाडी यात्रा-उत्सव कमिटीच्या वतीने या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.खासदारांच्याच गावात बैलगाडा शर्यती सुरू असल्याची बातमी सगळीकडे पसरली. शर्यतीबाबत आयोजकांना फोन येऊ लागल्याने शर्यती आटोपत्या घ्याव्या लागल्या. शर्यती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. सकाळी ११ वाजता शर्यतींना सुरुवात झाली. मात्र, १२.३०च्या सुमारास या शर्यती बंद झाल्या. या वेळी सुमारे २५ गाडे धावले. पारनेर, नगर, खेड, शिरूर या ठिकाणांहून बैलगाडे आले होते. मंचर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की शर्यतीबद्दल कळल्यानंतर पोलीस पथक लांडेवाडीत गेले. सुरू असलेल्या शर्यती बंद केल्या. पुन्हा शर्यती सुरू होऊ नयेत म्हणून आम्ही दिवसभर लांडेवाडीतच होतो. बंदी-स्थगिती-बंदीचा खेळ२००६मध्ये औरंगाबाद खंडपीठाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या बंदीला तात्पुरती स्थगिती देत त्या सुरू केल्या. ७ मे २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्राणी क्रूरता कायद्यानुसार पुन्हा शर्यतींवर कायमची बंदी घातली. पदरमोड करून अनेक बैलगाडा मालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. पंजाब, तमिळनाडूमध्ये जाऊन त्यांनी बैलगाडामालकांचे संघटन केले. बैलगाडा मालकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश येऊन ७ जानेवारी २०१६ रोजी वन व पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना जारी केली व पुन्हा शर्यती सुरू झाल्या. मात्र, उच्च न्यायालयाने शर्यतींवर बंदी घातली होती. ही बंदी झुगारून लांडेवाडीत बैलगाडा शर्यती झाल्या. या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यभरातून सुमारे १६० नामवंत गाडे या ठिकाणी आले होते. मला काहीही माहिती नाही : खासदार आढळराव-पाटीलशिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी गावात नव्हतो. बैलगाडा शर्यतीविषयी मला काहीही माहिती नाही,’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.