पुणे : पुण्यातील भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने, नगर येथील कांकरिया करंडकावर आपले नाव कोरले. राज्यस्तरीय कांकरिया करंडक स्पर्धेत बालरंजन केंद्राने 'श्यामची आई' हे देवेंद्र भिडे लिखित बालनाट्य सादर केले होते. त्यावर परीक्षकांनी आपल्या पसंतीची मोहोर उमटविली आणि हे नाटक करंडकाचे मानकरी ठरले.बालरंजन केंद्राच्या संस्थापक संचालिका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, बालरंजनचे तिसावे वर्ष आता संपत आले आहे. अशावेळी मिळालेले हे बक्षीस आनंददायी आहे. गेली पंधरा वर्षे आम्ही या स्पर्धेत भाग घेतो. त्यात अनेक पारितोषिके पटकाविली. तसेच हा मानाचा करंडक तिसऱ्यांदा मिळविला आहे. यंदा साने गुरुजींची आई यशोदा साने यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे श्यामची आई नाटकाची निवड केली. मुलांच्या सुंदर अभिनयाने ती निवड सार्थ ठरली.
पुण्यातील ‘बालरंजन’ने सादर केलेल्या श्यामची आई बालनाट्यास कांकरिया करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:08 PM
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने, नगर येथील कांकरिया करंडकावर आपले नाव कोरले. राज्यस्तरीय कांकरिया करंडक स्पर्धेत बालरंजन केंद्राने 'श्यामची आई' हे देवेंद्र भिडे लिखित बालनाट्य सादर केले होते.
ठळक मुद्देबालरंजन केंद्राने सादर केले होते 'श्यामची आई' हे देवेंद्र भिडे लिखित बालनाट्ययंदा साने गुरुजींची आई यशोदा साने यांचे जन्मशताब्दी वर्ष, त्यामुळे नाटकाची निवड