निमसाखर - शेळगाव हा रस्ता दोन राज्यमार्ग जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन जात असताना अनेक जड वाहतुकीबरोबर प्रवासी दुचाकी व चारचाकी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. अशा प्रकारे वाहतूक होत असताना पवारवस्तीनजीक काही वर्षापूर्वी ऊस ट्रकला विद्युत तारा गुंतल्यामुळे या भागातील विद्युत खांब यापूर्वीच वाकलेले व विद्युत तारा खाली आलेल्या स्थितीत होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी विद्युत तारा खाली आल्यामुळे एका सिमेंट ट्रकला या तारा गुंतल्यामुळे काही तारा तुटल्या तर परिसरातील खांबही वाकले. यामध्ये विद्युत प्रवाह वाढल्यामुळे घरगुती मीटर धारकांचे फ्रिज, विद्युत मोटर, बल्ब, फॅन जळाले असल्याचे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले. याच रस्त्यावर खाली आलेल्या विद्युत तारांमुळे अपघात होऊ नये म्हणून कळकाच्या काटीचा आधार देण्यात आला. तोही कळक कुजला असून पुन्हा अपघाताची या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्युत महावितरणने दखल घेऊन रस्त्याच्या कडेला दोन्ही ठिकाणच्याचे विद्युत खांब बदलुन पुरेशा उंचीचे खांब बसवावे. याच बरोबर याच मार्गावर कमी उंची असलेल्या आणखी दोन ठिकाणची विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन याही ठिकाणी खांबांची पुरेशा उंचीचे खांब त्या त्या ठिकाणी बसवावेत अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहे.
--
फोटो क्रमांक : ०५ निमसाखर इंदापूर विद्यूत तारा
फोटो ओळी : निमसाखर-शेळगाव रस्त्यावरील पवारवस्तीभागात रस्ता दुभागणाऱ्या विद्युत तारांना असा काटीचा आधार दिला आहे.