पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करायला बंदी घातल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मुख्य रस्त्यावर आंदोलन न झाल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही असे या आंदोलकांचे मत आहे.
पुण्यातले जिल्हाधिकारी कार्यालय हे शहरातल्या अनेक आंदोलनांचे मुख्य ठिकाण आहे. मात्र हे जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने बांधले गेल्यापासुन गेट समोरचे आंदोलनांचे ठिकाण बदलण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण सुरुवातीला झालेला विरोध आणि पाठोपाठ कोरोना मुळे असलेले लॅाकडाउन त्यामुळे याची अंमलबजावणी झाली नव्हती.
आता मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनासाठी दुसरे ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत. आता या आंदोलकांना पोलिस आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या एका ग्राउंड मध्ये आंदोलनासाठी निश्चित करण्यात आले आहे. हे मुख्य रस्त्यावर नसल्यामुळे आंदोलनांची दखल घेतली जाणार नाही अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याविषयी अंजुम इमानदार म्हणाले ,” कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. आंदोलन करून लोकांपर्यंत संदेश द्यायचा असतो तो जाणार नाही.त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी.”