पुणे : दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ पेक्षा अधिक डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरावर शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे़. त्याचबरोबर चिनी उडत्या आकाश कंदीलावरही मनाई कायम करण्यात आली आहे़. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत दोन तास फटाके उडविण्यास परवानगी दिली असली तरी पुणे पोलिसांनी काढलेल्या आदेशात रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही प्रकारच्या ध्वनी निर्माण करुन आवाजाचे प्रदुषण करणाऱ्या फटाक्यावर संपूर्ण मनाई करण्यात आली आहे़. सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी हा आदेश काढला असून ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान ही बंदी घालण्यात आली आहे़. रस्त्यावर किंवा त्यापासून ५० फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे ,दारु काम सोडणे , फेकणे, फायर बलून किंवा अग्निबाण सोडण्याला मनाई करण्यात आली आहे़. एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबल आवाजा निर्माण करणाऱ्या फटाक्यावर बंदी घालण्यात आली आहे़. तसेच फटाक्यांची माळ ५० ते १०० तसेच १०० व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११० /११५ व १२५ डेसिबल एवढी असावी़. त्यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या सर्व फटाक्यांच्या माळांवर बंदी घालण्यात आली आहे़. आकाशात पेटते आकाश कंदील सोडण्याच्या प्रकारात गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली होती़. अशा चिनी फार्इंग लाँटमस दिवाळीच्या पहिला दिवस, पाडवा या दिवशी सारसबागेसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन पेटते आकाश कंदील सोडले जात होते़. हे पेटते आकाश कंदील उंच गेल्यावर झाडाला तसेच इमारतीवर पडून आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या़.त्यामुळे शहर पोलीस दलाने गेल्या वर्षी त्याच्या विक्री व वापरावर बंदी घातली होती़. यंदाही या चिनी उडत्या आकाश कंदीलांवर बंदी घालण्यात आली आहे़.
१२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 3:40 PM
दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ पेक्षा अधिक डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरावर शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे़.
ठळक मुद्देरात्री दहा ते सकाळी ६ वाजेपर्यंत मनाई पुणे शहर पोलीस दलाचा आदेश चिनी उडत्या आकाश कंदीललावरही मनाई कायम कोणत्याही प्रकारच्या ध्वनी निर्माण करुन आवाजाचे प्रदुषण करणाऱ्या फटाक्यावर संपूर्ण मनाई