शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

गणेशखिंड रस्त्यावर वृक्षतोडीस बंदी; वृक्षप्रेमींच्या लढ्याला अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:16 PM

गणेशखिंड रस्ता, औंध जकात नाका ते विद्यापीठ चौकातील कोणतीही झाडे तोडण्यास मनाई करणारा आदेश महापालिकेच्या वृक्ष अधिकार्‍यांनी जारी केला आहे.

ठळक मुद्देराजकीय हस्तक्षेपामुळे पथ विभागाकडून या रस्त्यावरील तोडण्यात आली झाडेन्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे वड, पिंपळ व नांदुरकी या वृक्षांची तोड करता येणार नाहीत

पुणे : वृक्षतोडीचे प्रकरण सर्वसाधारण सभेत गाजल्यानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांना आता जाग आली आहे. गणेशखिंड रस्ता, औंध जकात नाका ते विद्यापीठ चौकातील कोणतीही झाडे तोडण्यास मनाई करणारा आदेश महापालिकेच्या वृक्ष अधिकार्‍यांनी जारी केला आहे. विशेष म्हणजे हा आदेश महापालिकेच्याच पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना बजावण्यात आला आहे.पथ विभागाने महापालिकेच्या वृक्ष अधिकार्‍यांकडे या रस्त्यावरील काही झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी म्हणून परवानगी मागितली होती. या रस्त्याचे काम सुरू असून त्या कामात या वृक्षांचा अडथळा होत होता. वृक्ष अधिकार्‍यांनी त्यांना काही झाडांच्या फांद्या तसेच वडाच्या पारंब्या तोडण्याची परवानगी दिली. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे पथ विभागाकडून या रस्त्यावरील अत्यंत जुनी अशी वड व पिंपळाची झाडे तोडण्यात आली.त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. सर्वच नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली. त्यामुळे आता जागे होत प्रशासनाने यासंबधीचा आदेश काढला आहे. दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या एका जनहित याचिकेनुसार कोणत्याही कामासाठी वड, पिंपळ, नांदुरकी या प्रजातीच्या वृक्षांची तोड करण्यात येऊ नयेत, असे निर्देश दिले. एरिया सभा असोसिएशन, पुणे यांच्या वतीने मकरंद देशपांडे, वैशाला पैटकर, स्वप्ना नारायण, माधवी राहिरकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

आता वृक्ष अधिकार्‍यांना पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना या आदेशाची कल्पना दिली आहे. त्यात त्यांनी वृक्ष अधिकार्‍यांनी तुम्हाला फक्त काही फांद्याच तोडण्याची परवानगी दिली होती, याचे स्मरण करून दिले आहे. यापुढे न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे वड, पिंपळ व नांदुरकी या वृक्षांची तोड करता येणार नसल्याने दिलेली काढून घेत असल्याचे म्हटले आहे. पुणे शहरात कुठेही आता यापुढे वरील प्रजातीचे वृक्ष तोडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही वृक्ष अधिकार्‍यांनी पथ विभागाला बजावलेल्या आदेशात म्हटले आहे

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट