काटेवाडी : दुष्काळी परिस्थितीमध्ये काटेवाडी परिसरात फळबागा जगवल्या आहेत. मात्र, बाजारभाव मिळत नसल्याने जनावरांना चारा म्हणून केळी टाकून देण्याची वेळ आली आहे. तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. काटेवाडी येथे केळीपिकाला योग्य भाव मिळत नाही. व्यापारी लॉबिंग करून कमी दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. उत्पादन खर्चही निघत नाही; उलट वाहतूकखर्च नको म्हणून जनावरांना चारा म्हणून केळी टाकून देणे शेतकरी पसंत करीत आहे. केळी हे फळ नाशिवंत आहे. ते २ ते ३ दिवस टिकते. याचाच फायदा व्यापारी घेत आहेत. (वार्ताहर)
दराअभावी केळी जनावरांसाठी
By admin | Published: January 07, 2016 1:36 AM