देवस्थानच्या वतीने श्रींच्या समोर दु. १२ वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने अर्पण केलेल्या फुलांची मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली, तर पाथर्डी येथील गणेशभक्त निखिल मंडलेचा यांच्याकडून श्री महागणपतीला १०१ डझन केळींची आरास करण्यात आली.यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशेबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.फुलांची आकर्षक सजावट,पोषाख व सुवर्ण अलंकार यामुळे श्रींची मूर्ती मन प्रसन्न करून लक्ष वेधून घेत होती. उपविभागीय अधिकारी, पुणे यांचे आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार दि.३१ रोजी संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री महागणपती मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीला केळीची आरास करण्यात आली होती.