राजगुरुनगर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त राजगुरुनगर येथे २३ मार्च या शहिददिनी आळंदी ते राजगुरुनगर येथे राज्य व्यसनमुक्त युवक संघाची भक्तीपीठ ते क्रांतीपीठ पदयात्रा घेऊन बंडातात्या कराडकर येथे आले होते. यावेळी भाषणात कराडकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे.
''स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. भारताला १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे अहींसेद्वारे मिळाले नसून सशस्त्र क्रांतिकारकांच्या कष्टातून मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.'' कराडकर म्हणाले, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव हे देशाच्या तीन वेगळ्या प्रांतातील तरुण एका समान धाग्याने एकत्र आले. तो म्हणजे स्वातंत्र्य. परंतु हे स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली. तो वणवा देशभर पेटला. आणी म्हणून ब्रिटीशांना येथून काढता पाय घ्यावा लागला.
साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीने मिळाले स्वातंत्र्य
भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या अहिंसेच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील. शेवटी आपल्याला हे माहीत आहेच 1947 साली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही. 1942 ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ क्विट इंडिया त्यामधून पोलिसांची कार्यालये, सरकारी कार्यालय पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या ज्या घटना घडत गेल्या. यातून इंग्रजांनी बोध घेतला, की आता भारत देश सोडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कुठंतरी असं सांगितलं जातं की 'साबरमती के संत तुने कर किया कमाल, असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात, अशा साडे तीनशे लोकांचे फोटो इथे मागे आहेत. त्या साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे, असं कराडकर म्हणाले.