निरवांगी : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे .इंदापुर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करे वस्ती परिसरातील हजारो हेक्टर शेती येथील निरा नदीच्या पात्रातील पाण्यावर अवलंबून आहे.या नदीच्या पात्रात पुर्वी कमी प्रमाणात विद्यूत मोटरा होत्या. परंतु दर वर्षी मोठ्या प्रमाणात या नदीच्या पात्रातुन विद्युुत मोटर संख्या मोठ्या प्रमाणात होऊ लागली. तसेच बंधारामधुन ही थोड्या प्रमाणात पाण्याची गळती होत असते. या पात्रातुन मोठ्या प्रमाणात झालेला वाळू उपसा या सर्व कारणामुळे या नदीच्या पात्रातील पाणी हे जुन ते फेब्रुवारी या महीन्या पर्यत च असते.या मुळेदर वर्षी आमच्या शेती साठी मार्च ते जुन या महिने नदी च्या पात्रात राहण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात भाटघर धरणातून पाणी सोडण्यात यावे. असेच नियोजन संबंधीत खात्याने करणे गरजे असल्याचे मत निरवांगी बरोबरच निमसाखर, दगडवाडी, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, कंळब परिसरातील नदीच्या किनारी असलेल्या शेतकरी वर्गाची मागणी आहे .निरवांगी येथील आनेक शेतकरी म्हणाले की, नदीपात्रातील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आहे. नदीपात्रातील काही ठिकाणी पाणी संपलेले आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे तेही दररोज मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने जून महिन्यापर्यंत पिके कशी राहतील, याकरिता पाणी सोडण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे . धरणातून पाणी सोडण्याचे लवकरच नियोजन करावे, अशी मागणी येथील शेतकºयांनी बोलून दाखवली.निरवांगी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पिकावर हजारो रुपये खर्च केले आहेत . परंतु सध्या नदीपात्रातील काही क्षेत्र पाण्याअभावी कोरडे पडलेले आहे. ज्या पात्रात थोडे पाणी आहे ते काही दिवसच राहील असे चित्र दिसून येत आहे .यामुळे संबंधित खात्याने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.
बंधा-यातील पाणीसाठा कमी, हजारो हेक्टर शेती जळण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 2:36 AM