शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बांग्लादेशीय घुसखोर तालुक्यातही!

By admin | Published: October 15, 2015 12:43 AM

परप्रांतियांच्या नावाखाली बांग्लादेशीय नागरीकांचा मोठा लोंढा जुन्नर तालुक्यात येत असल्याने भविष्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे़

सचिन कांकरीया, नारायणगावपरप्रांतियांच्या नावाखाली बांग्लादेशीय नागरीकांचा मोठा लोंढा जुन्नर तालुक्यात येत असल्याने भविष्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे़ नुकतेच दोन बांग्लादेशीय नागरीकांना नारायणगाव पोलीसांनी अटक केल्यानंतर या तालुक्यातील त्यांचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बांग्लादेशीयांना शोेधून काढणे हे पोलीसांपुढील मोठे आव्हान आहे़ नारायणगाव परिसरात गेल्या आठ महिन्यापासून जहॉंंगीर रोबीउल मंडुल (वय ३४) व माश्यद रोबीउल मंडुल (वय २३) दोघे मुळ बांग्लादेशी नारायणगावातील मुक्ताबाई मंदिराजवळ वास्तव्य करीत होते़ इतरही अनेक बांग्लादेशीय नागरीक परिसरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तीन वर्षापूर्वी देखील एका बिल्डरकडे एक बांग्लादेषीय नागरीक वास्तव्यास होता़ पोलीसांनी त्यास मोबाईलच्या साहयाने शोेधून काढले होते.़ त्यालाही पोलीसांना अटक केल्यानंतर त्याने पॅनकार्ड व इतर पुरावे तयार करून भारतीय रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली होती़ त्या बांग्लोदशीय नागरीला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती़ शिक्षा भोगल्यानंतर या नागरीकास त्याच्या मायदेशी पाठविण्यात आले होते़ हा बाग्लांदेशी नागरीक ज्याच्याकडे काम करीत होता़ त्या ठेकेदाराकडे पोलीसांनी चौकशी केली असता तो पश्चिम बंगालमध्ये असल्याचे भासवित होता़ त्याचेकडे त्या भागातील बनावट कागदपत्र देखील उपलब्ध होते.़ पोलीसांनी त्याला कागदपत्र जमा करण्यासाठी सोडले. परंतू तो ठेकेदार संपुर्ण कुटूंबासह रातोरात पसार झाला़ आज त्याचा विकत घेतलेला फ्लॅट बंद अवस्थेत आहे़ अशाच प्रकारे हे दोन देखील बाग्लांदेशी पोलीसांच्या ताब्यात आले आहेत़ त्यांनीही देशांच्या सिमेलगत दलालांना ६ ते ८ हजार रूपये देवून भारतात प्रवेश मिळविला होता़ हे बांग्लादेशी कामधंदयाच्या निमित्ताने पसिरात वास्तव्य करतात़ त्यानंतर स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून रहिवाशी दाखला मिळवतात़ पॅनकार्ड किंवा आधारकार्ड मिळवतात. या दोन्हा कार्डच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अनेक बांग्लादेशी नागरीकांनी स्थानिक रेशनकार्ड देखील मिळविलेले आहे़ आज देखील अनेक बाग्लांदेशी नागरीक वास्तव्यास असल्याची चर्चा परिसरात आहे़ बरेच बांग्लादेशी आल्यानंतर ते परिसरातील हॉटेलमध्ये किंवा बांधकाम व्यवसायामध्ये मोलमजुरी करताना दिसतात़ हे नागरीक व्यावसायिक दृष्टीकोनातून भारतात घुसखोरी करतात. मिळेल तेथे काम करतात वेळप्रसंगी मोलमजुरी करतात. वर्ष दोन वर्ष काम करून पैसे जमा करतात व पश्चिम बंगालच्या हद्दीतून एजंटांना हाताशी धरून बाग्लांदेशाच्या सरहद्दीत प्रवेश करतात़