पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या अारेपावरुन न्यायलयीन काेठडीत असलेल्या बॅंक अाॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला अाहे.
डिएसके यांना निमबाह्य कर्ज दिल्याच्या अाराेपावरुन बॅंक अाॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे अाणि इतर कर्मचाऱ्यांना पुणे पाेलीसांनी अटक केली हाेती. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात अाली हाेती. साेमवारी विशेष न्यायाधीश अार. एन सरदेसाई यांच्या न्यायालयात मराठे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली हाेती. यावेळी सरकार तसेच बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला हाेता, परंतु न्यायालयाने निकाल राखून ठेवला हाेता. मंगळवारी विशेष न्यायाधीश अार. एन . सरदेसाई रजेवर असल्याने सुनावणी हाेऊ शकली नाही. बुधवारी पुन्हा सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने मराठे यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला अाहे. हा जामीन मंजूर करताना भारता बाहेर न जाण्याच्या तसेच पाेलीसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटी घालण्यात अाल्या अाहेत. ठेवीदारांची फसवणूक आणि कुलकर्णी यांना देण्यात आलेले कर्ज या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत, असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी जामीनासाठी केला हाेता.
दरम्यान रिझर्व बॅंकेची परवानगी न घेता मराठे यांना पुणे पाेलीसांनी अटक केल्याने पुणे पाेलीसांवर टीका करण्यात येत हाेती. तसेच मराठेंच्या अटकेबाबत पाेलीसांनी अाततायीपणा केल्याचे मंगळवारी शरद पवार म्हणाले हाेते, तर राज ठाकरे यांनीही मराठे यांच्या अटकेबाबत नाराजी व्यक्त केली हाेती. मराठे यांच्याबराेबरच अटक करण्यात अालेल्या इतर पाच जणांवरील जामीन अर्जावर उद्या सुनावणी हाेणार असून त्यांना जामीन मंजूर हाेताेय का याकडे अाता सगळ्यांचे लक्ष लागले अाहे.