शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
5
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
6
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
7
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
8
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
9
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
10
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
11
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
12
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
13
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

खातेदारांना पैसे देण्यास बँकेचा नकार

By admin | Published: December 22, 2016 11:52 PM

बँकेत पैसे असतानादेखील येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये चार दिवस ग्राहकांना पैसे देण्यास नकार देण्यात आला. बँकेच्या

शिरूर : बँकेत पैसे असतानादेखील येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये चार दिवस ग्राहकांना पैसे देण्यास नकार देण्यात आला. बँकेच्या व्यवस्थापिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याचे अनेक ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अखेर एका ग्राहकाने थेट मुंबईच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधल्याने आज फक्त दोन हजार रुपये ग्राहकांना देण्यात आले.ग्राहकांना आज पैसे देण्याचा निर्णयही सहायक व्यवस्थापकाने घेतला. या अधिकाऱ्याच्या या निर्णयावरही शाखा व्यवस्थापिका प्रणोती यांनी नाराजी व्यक्त केली. ‘या अधिकाऱ्याने ग्राहकांना पैसे देण्याचा निर्णय घेतलाय ना; मग आता त्यांनीच तो निस्तरावा,’ असे या व्यवस्थापिका त्यांच्याकडे जाणाऱ्या ग्राहकांना सांगत होत्या. व्यवस्थापिकेच्या या आडमुठेपणाचा बहुतांशी ग्राहकांना अनुभव आला. त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेलेल्या ग्राहकांना त्या अरेरावी करून हुसकावून लावत होत्या. ‘कोणाकडे माझी तक्रार करायची, करा’ असे सांगत होत्या.आज बँकेत ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. १७ डिसेंबरपासून बँकेतून ग्राहकांना पैसे देण्यास नकार मिळत आहे. आज एसटी महामंडळाचे निवृत्त अधिकारी दत्तात्रय कापरे यांनी बँकेच्या मुंबई मुख्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला व चार दिवसांपासून बँकेतून पैसे दिले जात नसल्याची तक्रार केली. अधिकाऱ्याने बँकेच्या सहायक व्यवस्थापकाशी संपर्क साधला व ग्राहकांना पैसे द्या, अशी सूचना केली. यावर या सहायक व्यवस्थापकाने व्यवस्थापिका प्रणोती यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेची माहिती दिली. ग्राहकांना आता पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. तरीही, व्यवस्थापिकेने यावर नाराजी व्यक्त केली.(वार्ताहर)