नारायणगाव पोलीस स्टेशन सभागृह येथे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील ६५ बँक मॅनेजर, प्रतिनिधी यांच्या बैठकीत डॉ. अभिनव देशमुख हे बोलत होते. या वेळी जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्यासह ओतूर, जुन्नर, आळेफाटा, मंचर, घोडेगाव, खेड या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
या वेळी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी बँक व बँकेचे एटीएमच्या सुरक्षेसंदर्भात आणि पुणे जिल्हयामध्ये एटीएम मशीन चोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर काही उपाययोजना कशा करता येतील, या संदर्भात मार्गदर्शन करून बँक मॅनेजर यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केले, तर सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी आभार मानले.
जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील बँक मॅनेजर, प्रतिनिधी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख.