शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Vadgaon Sheri Vidhan Sabha: वडगावशेरीचे बापू तब्बल ३०७ कोटींचे मालक; सुनील टिंगरे ५३ कोटींचे धनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 4:19 PM

उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला उमेदवारांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात हा तपशील

पुणे : वडगावशेरी मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्या कुटुंबाची एकत्रित मालमत्ता ३०७ कोटी ९५ लाख ९५ हजार ९०५ रुपये आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला त्यांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात हा तपशील देण्यात आलेला आहे. तर सुनील टिंगरे केवळ ५३ कोटी ८१ लाख ४२ हजार ९७३ रुपयांचे धनी आहेत. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापू पठारे

जंगम मालमत्ता विवरण

१) बापूसाहेब तुकाराम पठारे - २,२९,२०,३६७/-२)⁠ संजिला बापूसाहेब पठारे (पत्नी) - १,१६,८८,६२१/-

३) ⁠हिंदू अविभक्त कुटुंब - ११२,७२,२९,७६६/-४) ⁠सुरेंद्र बापूसाहेब पठारे (मुलगा) - २५,२२,५९,२०६/-

- एकूण मूल्य - १४१,४०,९७,९६०/-स्थावर मालमत्ता१) बापूसाहेब तुकाराम पठारे - २८,४४,७९,२७८/-

२) संजिला बापूसाहेब पठारे (पत्नी) - ११,७४,७६,५२१/-३) हिंदू अविभक्त कुटुंब - १४,३८,६७,०१८/-

४) सुरेंद्र बापूसाहेब पठारे (मुलगा) - १११,९६,७५,१२८/-एकूण मूल्य - १६६,५४,९७,९४५/

स्थावर व जंगम मालमत्तेची एकूण रक्कम - ३०७,९५,९५,९०५/-बँक कर्ज - बापूसाहेब पठारे यांच्या नावे ९५,२६,८३९ रुपये, संजिला पठारे यांच्या नावे ९,४३,२०८ रुपये; तर सुरेंद्र पठारे यांच्या नावे ४१,३७,६५,०२९ इतकी देणी आहे. कर्जस्वरूपात एकूण ४२,४२,३५,०७६ आहे.गुन्हे -१) महागाई विरोधी जनआंदोलन केल्याने विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम १८८ नुसार खटला नोंद.

२) पाणीप्रश्नासाठी जनआंदोलन केल्याने येरवडा पोलिस स्टेशन येथे भादंवि १४७, १४८, १४९, ३५३, ३२३, ३३६, ३३७, ४२७, ५०४ नुसार खटला नोंद.३) किरकोळ वादामुळे येरवडा पोलिस स्टेशन येथे भादंवि १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३४१, ३२५, ५०६ (२), ५०४ नुसार खटला दाखल. या तीनही प्रकरणी कोणतेही दोषारोप ठेवण्यात आलेले नाही किंवा कोणताही खटला प्रलंबित नाही. तसेच मुलगा सुरेंद्र पठारे यांच्याबाबत कुठलाही गुन्हा नोंद नाही.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टिंगरे 

एकूण मालमत्ता - ५३ कोटी ८१ लाख ४२ हजार ९७३ रुपये. (जंगम - स्वत:च्या नावे ५,४५,४४,३५९, तर पत्नी मनीषा टिंगरे यांच्या नावे १,६२,७९,२५३ रुपये. स्थावर - स्वत:च्या नावे २७,२७,५९,३५४ रुपये, तर पत्नीच्या नावे १९,२७,५९,७५४ रुपये.)

गुन्हे - बीआरटी विरोधात आंदोलन केल्याने विमानतळ पोलिस स्टेशन येथे भादंवि १४३, मपोका कलम ३७ (१), ३ (२५), १३५ नुसार गुन्ह्याची नाेंद, मनपा मुख्य इमारतीतील भाजप, शिवसेना कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश करून सामानाचे नुकसान केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे भादंवि १४३, १४६, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६, ४२७ गुन्हे दाखल. खटला प्रलंबित नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vadgaon-sheri-acवडगाव शेरीsunil tingreसुनील टिंगरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार