शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

बारामतीत पासपोर्ट सेवा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 4:07 AM

दर ५० किलोमीटरवर सुविधा : परराष्ट्र मंत्रालयाचे उद्दिष्ट

पुणे : राज्यात बारामती आणि माढा यासह अमरावती, अकोला, चंद्र्रपूर येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे त्या संदर्भात ट्विटरद्वारे माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने देशात दर ५० किलोमीटर अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र्र उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ हा कार्यक्रम पोस्ट विभागाच्या मदतीने सुरू केला आहे. पासपोर्ट तुमच्या दारी या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.या टप्प्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या ठिकाणांसह पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्यांच्या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रासह देशात १४ राज्यांमध्ये ३८ नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.‘पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पहिल्या दोन टप्प्यांत महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्र परिक्षेत्रातील सिल्वासा व दमण-दीव या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रे उघडण्यात आली आहेत. या कार्यक्रमांतर्गत १३ सेवा केंद्र्रे सुरू झाली असून उर्वरित ७ पासपोर्ट सेवा केंद्रे लवकरच उघडण्यात येणार आहेत. तसेच, तिसºया टप्प्यातील ५ पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू झाल्याने नागरिकांना पासपोर्ट मिळविणे सोपे होणार आहे.

टॅग्स :passportपासपोर्टBaramatiबारामती