बारामती: बारामती तालुक्यातील ढेकळवाडीत सोमवारी सायंकाळी दोन रानगवे आढळले. परिसरात प्रथमच हा वन्यप्राणी आढळला आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यात हे प्राणी पोहचल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. सुरक्षित जंगल सोडून गावांमध्ये रानगवे आढळल्याने या परिसरात भीती पसरली आहे.
काही दिवसांपूर्वीच भोर आणि दौंड तालुक्यांमध्ये रानगवे आढळले होते. आज येथील शेतकरी अंकुश ठोंबरे यांना त्यांच्या शेतामध्ये दोन रानगवे दिसले आहेत. ठोंबरे यांनी याची माहिती पृथ्वीराज जाचक यांना दिल्यानंतर जाचक यांनी वालचंद नगर पोलीस ठाणे आणि वन विभागाशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली.
यापूर्वी परिसरात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असल्याचेही समोर आले आहे. बारामती आणि इंदापूरच्या वेशीवरच्या ढेकळवाडी गावं आहे. यापूर्वी ढेकळवाडी लगतच्या काटेवाडी, कन्हेरी गावात तीन बिबटे आढळले होते. वन विभागानेही पिंजरा लावून बिबटे पकडलें होते.