शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण बारामती बंद, नगरपालिकेसमोर निषेध सभा, विविध संघटनांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:11 AM

बारामती : येथील माजी नगरसेवक अ‍ॅड. विजय गव्हाळे यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहरात विविध संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या बारामती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांसह कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.अ‍ॅड. विजय गव्हाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती शहरात ...

बारामती : येथील माजी नगरसेवक अ‍ॅड. विजय गव्हाळे यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहरात विविध संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या बारामती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांसह कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.अ‍ॅड. विजय गव्हाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती शहरात अज्ञात तीन व्यक्तींनी चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात गव्हाळे हे जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल व घटनेच्या निषेधार्थ आज दि. १३ सप्टेंबर रोजी बारामती बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार बारामती शहरात सर्व व्यावसायिकांनी बंद पाळला. दुपारी चारनंतर बंद असलेली दुकाने उघडण्यात आली.दरम्यान, बारामती शहरात सकाळी ११ वाजता विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणाहून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, रिपाइंचे पश्चिम महाराष्टÑाचे अध्यक्ष एम. बी. मिसाळ, मनसेचे राज्य सचिव अ‍ॅड. सुधीर पाटसकर, मनसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विनोद जावळे, मुनीर तांबोळी, सोमनाथ गजाकस, बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय लोंढे आदींनी अ‍ॅड. गव्हाळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी मखरे यांनी राज्य सरकारवरटिकेची झोड उठवली. दरम्यान, या मोर्चाचे नियोजन चंद्रकांत खंडाळे, अरविंद बगाडे, रमेश साबळे, भोला जगताप, अ‍ॅड. विनोद जावळे, तानाजी पाथरकर, माऊली दुर्गे आदींसह इतरांनी केले होते.तिघांना न्यायालयीन कोठडी अ‍ॅड. विजय गव्हाळे यांच्यावर केलेल्या हल्ला प्रकरणातील तिघांना मंगळवारी (दि १२) सायंकाळी बारामती शहर पोलिसांनी अटक केली. विकास ऊर्फ नानाजी धनाजी बाबर (वय २७, रा. पिंपळी, ता. बारामती), अभय दिलीप केमकर (वय २५, हल्ली रा पंचतालिम कैकाडगल्ली, बारामती, मूळ रा. मेडद, ता माळशिरस, जि. सोलापूर) व गणेश सुभाष जाधव (वय २४, हल्ली रा. देसाई इस्टेट, बारामती, मूळ रा. मिरजगाव, ता. कर्जत) अशी अटक करण्यात आले्ल्या संशयितांची नावे आहेत. आरोपीच्या बाजूने वकील नसल्याने न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून दि.२३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे