शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

बारामतीला झोडपले

By admin | Published: May 10, 2015 5:00 AM

बारामती शहरात शनिवारी (दि. ९) विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील गणेश मंडईत या अचानक

बारामती : बारामती शहरात शनिवारी (दि. ९) विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील गणेश मंडईत या अचानक आलेल्या आजच्या पावसाने फळ, भाजी विक्रेत्यांबरोबरच शेतकऱ्यांनादेखील त्रास झाला. त्याचबरोबर ग्राहकांची त्रेधा उडाली. फळांचे आणि भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तालुक्यात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी सहा वाजता अचानक पाऊस सुरू झाला. शहरात होत असलेल्या गणेश मंडईच्या बांधकामामुळे फळभाजी विक्रेत्यांसाठी रिंगरोडलगत तात्पुरती सोय करण्यात आली आहे. मात्र, शनिवारी झालेल्या पावसाने भाजीपाला भिजला. तसेच, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या कट्ट्यांभोवती पाण्याचे डोह साठले. त्यातून मार्ग काढताना ग्राहकांचीदेखील त्रेधा उडाली. मंडईच्या कामामुळे स्थलांतरित केलेल्या ठिकाणी पावसाने दलदल होऊ नये, यासाठी फरशी अथवा सिमेंट काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी ठेकेदाराकडे करण्यात आली आहे. परंतु, ठेकेदाराने भाजीविक्रेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, अशी खंत फळभाजी विक्रेते चिऊशेठ जंजिरे यांनी व्यक्त केली.वालचंदनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊसरात्री ८ वाजल्यानंतर वालचंदनगरसह अन्य परिसरात विजेच्या कडकडाटसह जोरदार वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वालचंदनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. रत्नपुरी, शिरसटवाडी, जंक्शन परिसरात विजेचा लंपडाव सुरू होता. त्यानंतर तुरळक पावसाच्या सरी पडल्या. उशिरापर्यंत पावसाच्या सरी तुरळक प्रमाणात कोसळत होत्या. इंदापूर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)