बारामतीः राज्यातील सर्वाधिक चर्चेची आणि आकर्षणाची लढत म्हणजे बारामतीची लढत आहे.. त्याठिकाणी अमित शहा यांनी सभा घेऊन शरद पवारांनाच एकप्रकारे लक्ष केले होते..धोक्याची घंटा असलेल्या सुप्रिया सुळे पहिल्या फेरीत कांचन कुलयांच्याकडून पिछाडीवर पडल्या होत्या मात्र त्यांनंतरच्या फेऱ्यांमध्ये सुळे यांनी हि पिछाडी भरून काढत निर्णायक आघाडी कुल यांच्या विरोधात घेतली .. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तिथे हॅटट्रिक मारण्यासाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे बारामतीच्या कन्या असलेल्या दौंडच्या कांचन राहुल कुल यांनी त्यांना तगडे आव्हान दिले आहे. कुल यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपाच्या सर्व रथी-महारथींनी कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचे बघायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ताज्या माहितीनुसार २९, ९१३ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना१,९६,४३० मतं मिळाली असून कांचन कुल यांच्या पारड्यात १,६६,५१७ मतं पडली आहेत.
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळे यांना महादेव जानकरांनी चुरशीची लढत दिली होती. 2009 साली देशात तिसऱ्या क्रमांकाची व राज्यात पहिल्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या सुळे यांना 2014 साली फक्त 69 हजार 666 एवढे मताधिक्य मिळाले. त्यांना एकूण 5 लाख 21 हजार 562 मते मिळाली होती, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मते मिळाली होती.-------------------