Baramati Lok Sabha Election 2024 :अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची बँकेत, सोन्यात,'संपत्ती' ट्रॅक्टर, ट्रेलरही नावावर ; पाहा संपूर्ण तपशील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:16 PM2024-04-18T21:16:38+5:302024-04-18T21:19:00+5:30
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघावर पूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे.
Baramati Lok Sabha Election 2024 :बारामती लोकसभा मतदारसंघावर पूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. ही लढत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार अशीच सुरू आहे, यामुळेच जोरदार चर्चा सुरू आहे. आज महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्रातून संपत्तीविषयी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर स्थूल मूल्य हे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ एवढं आहे.
राजेच ते, संपत्ती किती विचारायची नसते! उदयनराजेंनी स्वत:च जाहीर केली
बँकेतील ठेवी
सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञा पत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हातातील रोख रक्कम ३ लाख ३६ हजार ४५० रुपये एवढी आहे. बँकेत त्यांच्या नावे २ कोटी ९७ लाख ७६ हजार रुपये आहे. तर पती अजित पवार यांची बँकेतील ठेवी २ कोटी २७ लाख ६४ हजार ४५७ रुपये एवढी आहे.
सुनेत्रा पवार यांच्या नावावर बँकेत कर्जही आहे
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर १२ कोटी ११ लाख १२ हजार ३७४ रुपयांचे कर्ज आहे. अजित पवार यांच्या नावावरही कर्ज ४ कोटी ७४ लाख ३१ हजार २३९ रुपयांचं कर्ज आहे.
शेअर्समधील गुंतवणूक
सुनेत्रा पवार यांनी शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांनी वेगवेगळ्या शेअर्समध्ये १५ लाख ७९ हजार ६१० रुपये एवढी रक्कम गुंतवली आहे. बचत योजनांमध्ये ५६ लाख ७६ हजार ८७७ रुपये गुंतवले आहेत. ६ कोटी ५ लाख १८ हजार ११६ रुपयांचे व्याजाचे मूल्य आहे.
सोन्या-चांदीतही गुंतवणूक
सुनेत्रा पवारर यांच्याकडे ३४ लाख ३९ हजार ५६९ रुपये इतक्या रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिणे आहेत. यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश आहे.
वाहनांचाही समावेश
सुनेत्रा पवार यांच्याकडे १० लाख ७० हजारांच्या किमतीच्या गाड्या आहेत. यामध्ये एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहे.
स्थावर मालमत्ता
सुनेत्रा पवार यांच्याकडे ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यात शेतजमिन आणि बिगरशेतीच्या जमिनिचा समावेश आहे. सुनेत्रा पवारांच्या नावे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ रुपयांची जंगम मालमत्ता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे १३ कोटी २५ लाख ६ हजार ०३३ रुपये एवढी आहे.