Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 11:49 AM2024-05-07T11:49:13+5:302024-05-07T11:51:53+5:30
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे.
Baramati Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना लोकसभेला होत आहे. यामुळे हा मतदारसंघ महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, आज सकाळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर पैसे वाटल्याचा आरोप केला. तर आता आणखी एक व्हिडीओ शेअर करुन इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे कार्यकर्त्यांना बोलत असल्याचे दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पवार यांनी भरणेंवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये काय?
"केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते.
पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024