Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनीही निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. यामुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांनी बारामती मतदारसंघात भेटीगाठी वाढवून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका सुरू केल्या होत्या. दरम्यान, दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाल्याचे समोर आले. या बैठकीत शिवतारेंची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. आज विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला.
कीर्तिकरांना ईडीचं दुसरं समन्स; अमोल कीर्तिकर म्हणाले, 'मी माझ्या मतदारसंघात कुठेही...'
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अडीच तास बैठक झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांच्या भावना या मी तिघांना कळवल्या. आता उद्या मी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये काय झालं त्याची सगळी माहिती उद्या मी कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे. राजकारणात आम्ही स्वत:साठी नाहीतर जनतेसाठी लढत असतो. मी उद्याची बैठक करुन पुन्हा मुंबईला जाणार आहे, असंही विजय शिवतारे म्हणाले.
राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो
यावेळी बोलताना शिवतारे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असणाऱ्या वादावर सूचक वक्तव्य केले. शिवतारे म्हणाले, राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असं सूचक विधान शिवतारे यांनी केले आहे. यामुळे आता शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही याची चर्चा सुरू आहे.
"उद्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचे मत काय आहे हे जाणून घेणार आहे. त्यांची मत निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह असतील हे जाणून घेणार आहे. जर उद्या गरज वाटली तर प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितलं. मी जनतेचा आवाज बघून मी हे पाऊल उचललं होतं, त्यामुळे बारामती मतदारसंघातील हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, असंही शिवतारे म्हणाले. (Baramati Lok Sabha Election )