Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 01:12 PM2024-05-07T13:12:22+5:302024-05-07T13:14:39+5:30
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघात आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या प्रचारसभा संपल्या आहेत.
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघात आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या प्रचारसभा संपल्या आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी श्रीनिवास पवार अजितदादांवर मिशा काढण्यावरुन टीका केली होती. यावर आज अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, आता श्रीनिवास पवार यांनी पुन्हा एकदा मिशीवरुन उपमुख्यमंत्री पवार यांना डिवचलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
काही दिवसापूर्वी प्रचारात श्रीनिवास पवार म्हणाले होते की, ४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील. या टीकेला आज अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले, अजित पवार म्हणाले, अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि काढ मिशा. यावर आता श्रीनिवास पवार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
श्रीनिवास पवार म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवारांचा आहे. हा पवारांचा गड आहे. काल रात्री कोण घराघरात फिरत होतं आणि काल कोण रात्रभर फिरत होतं, गड किती अभेद्य आहे हे शरद पवारांना माहित आहे. तर काहीजण गडाला भेगा पडल्यात का म्हणून रात्रभर फिरत होते, असा टोलाही पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
"मी काल सामान्य मतदारांसारखा रात्री झोपलो. बारामतीमध्ये काल बऱ्याच गोष्टी घडल्या, माझ्या कानावरही आल्या. पण,यामुळे काही फरक पडलेला नाही. कितीही रात्रभर फिरले तरी काही फरक पडणार नाही. बारामती काय आहे हे चार जूनलाच कळेल. मिशीच्या टीकेवरुन बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, तो शब्दाचा पक्का आहे. तो शब्द राकेल अशी मी आशा करतो, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.
राजकारण आज संध्याकाळी संपलं
"हे राजकारण आहे, आज संध्याकाळी संपलं. आम्ही एकाच आईची दोन मुल आहेत. ते राजकारणात आहेत, मी नाही.त्यांच चांगल वक्तृत्व आहे ते स्टेज गाजवतात, मी कधीही स्टेजवर बोलत नाही. आज शेवटच्या दिवशी अति झालं म्हणून मी बोललो. मी राजकारणात कधीही येणार नाही, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.