"बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर..."; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:09 PM2024-06-05T15:09:35+5:302024-06-05T15:13:19+5:30

Shriniwas Pawar : निकालानंतर आता श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

baramati lok sabha election 2024 Srinivas Pawar reacts after the verdict in Baramati | "बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर..."; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं

"बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर..."; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट झाल्यानंतर लोकसभेच्या पहिल्यांदाच निवडणूका झाल्या. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली. यात सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही त्यांच्या विरोधात प्रचार केला. निकालानंतर आता श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

NDA च्या बैठकीनंतर आजच सरकार स्थापनेचा दावा करणार PM मोदी! या पक्षांची भूमिका असेल महत्वाची

"काल खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. या विजयानंतर आता अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत येणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, यावर श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली, पवार यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे आले तर परत घेणार का? यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, शेवटी शरद पवार आणि सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे तो निर्णय घेतील. पक्ष तो निर्णय घेईल. 

"त्यांचा काल पराभव झाला तेव्हा आम्हाला वाईट वाटले. सुप्रिया आणि मी काल यावर बोललो आहे. शेवटी तो माझा मोठा भाऊ आहे, आम्ही त्याच्याकडे आदराने बघितले आहे. पण त्याचे काही निर्णय चुकायला लागले तेव्हा आम्ही त्याला बोलून बघितलं. जे योग्य सुरू आहे ते पाहून याचे वाईट वाटत होतं.मी बोलून बघितलं पण त्यांनी ऐकले नाही, असंही श्रीनिवास पवार म्हणाले. 

बारामती शरद पवार यांचीच आहे

" बारामती ही शरद पवार यांचीच आहे हे सिद्ध झाले आहे. सुळे असली तरी ती आमचीच आहे हे बारामतीकरांनी दाखवून दिलं आहे. बारामतीकरांनी मुलीला १ लाख ५३ हजार मतांची भेट दिली आहे, असंही श्रीनिवास पवार म्हणाले. 

‘लोकसभेत ताईच आणि विधानसभेत दादा’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व फाटाफूट झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार? याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून होते. त्यानंतर चुरशीच्या झालेल्या लढतीत सुळे यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीपासून आघाडी घेतल्यानंतर त्यांना किती मताधिक्य मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. मात्र, मतदारांनी ‘लोकसभेत ताईच आणि विधानसभेत दादा’ असे समीकरण डोक्यात ठेवूनच सुप्रिया सुळे यांना तब्बल १ लाख ५३ हजार ९६० मतांची आघाडी दिली. यात महत्त्वाचे म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातून सुळे यांना तब्बल ४८ हजार १६८ मतांची आघाडी मिळाली.

Web Title: baramati lok sabha election 2024 Srinivas Pawar reacts after the verdict in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.