Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतील दोन्हा गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार मैदानात उतरले पडले असून आता अजित पवार यांच्याकडूनही सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सुरू आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी बारामतील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं. दुसरीकडे, शिवतारे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन त्यांची समजूत काढली. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरुन जोरदार टीका केली आहे.
" बारामतीमध्ये जनता विरुद्ध अजितदादांनी घेतलेला निर्णय अशी लढत आहे. सागर बंगला काही गोष्टी देण्याचं केंद्र झालं आहे. आता भाजपाने कुटुंब आणि पक्ष फोडला आहे त्यामुळे लोक चिडले आहेत. भाजपाचे अनेक कार्यकर्ते अजितदादांचा प्रचार करणार नाहीत, ते 'तुतारी'चा प्रचार करतील. त्यामुळे सुप्रिया सुळेंचं लीड अडिच लाख असणार आहे. शिवतारे जर असा यु-टर्न घेत असतील तर लोक त्यांना दुटप्पी भूमिका घेता अस म्हणतील, ते शांत झाले असले तर त्यांनी अजितदादांवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचले आहेत ते कसे डिलिट करणार, असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी लगावला.
आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार
आमदार रोहित पवार म्हणाले, निलेश लंके ज्यावेळी अजितदादांकडे होते तेव्हा ते लोकांच्यात फिरत होते तेव्हा तिथली लोक त्यांना साहेबांसोबत राहा असं सांगत होते. यानंतर त्यांनी दौरा केला आणि लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता साहेबांबरोबर आल्यामुळे ते मोठ्या मताधिक्क्याने निवडणून येतील असं मला तरी वाटतं. आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत सांगलीबाबत चर्चा होईल. मैत्रिपूर्ण लढत कुठेही होणार नाही, असंही पवार म्हणाले.
" अजित पवार यांच्या पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत नऊ सर्व्हे केले आहेत. नवव्या सर्व्हेतही सुप्रिया सुळे पुढे आहेत. आता दहावा सर्व्हे करतील आणि उमेदवार जाहीर करतील. महायुतीच्या इतर उमेदवारांबाबतीत केंद्रातील आदेश आले तर ऐकावे लागतील, त्यामुळे आता बैठका घेऊन आम्ही भांडत असल्याचे दाखवतील आणि मान्य करतील, सामान्य लोकांना कोणतीही आनंदाची बातमी येत नाही पण आता प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी गोड बातमी आली त्यांना क्लिनचीट मिळाली ही बातमी ऐकून त्यांना मिरचीही गोड लागली असेल, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.