एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संकल्पनेतून बारामती शहर व तालुक्यात मिशन एक लाख वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड या पावसाळ्यात करण्यात येणार आहेत. अभियानाचा फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते भिगवण रस्ता येथे वृक्ष लागवड करून शुभारंभ करण्यात आला. शहर परिसरात ८०० च्या आसपास वृक्ष लागवड झाली आहे. आठ हजार वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टापैकी उर्वरित वृक्ष लागवडीचे नियोजन नगरपरिषदेच्या उद्यान विभागामार्फत केले आहे.
परिसरात देशी, आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेल्या १४७ वनस्पतींची लागवड करून बायोडायव्हरसिटी उभारण्यात आला आहे. यामध्ये गवती चहा, बेडकीपाला, पानफुटी, ओवा, तुळस, कापुरतुळस, गुंजवेल, कांडवेल, अक्कलकाढा वनस्पती, पेपरमिंट इ. वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा अभिजित जाधव, गटनेते सचिन सातव, नगरसेविका डॉ. सुहासिनी सातव, जयसिंग देशमुख, गणेश सोनवणे, शारदा मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते रणजित तावरे, डॉ. सुनीता शाह, डॉ. विशाल मेहता उपस्थित होते.