नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतधारक व नळधारक यांना त्यांचेकडील मार्च २०२१ पर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची मागणी बिले यापूर्वी देण्यात आली आहेत. करांचा भरणा करणेची मुदत संपत आलेली असून ज्या थकबाकीदारांकडून रक्कम येणे बाकी आहे त्या संबंधित थकबाकी रकमेवर कायद्यातील तरतूदीअन्वये बिलात नमूद केल्याप्रमाणे दरमहा दोन टक्के शास्तीची रक्कम भरावी लागत आहे. थकबाकीदारांनी कर न भरल्यास पाणी कनेक्शन बंद करणे, मालमत्ता अटकावून ठेवणे अगर वॉरंट काढून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या थकबाकीदार मिळकत धारकांनी अद्यापही घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची रक्कम भरली नाही त्यांची नावे वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात येतील. मिळकतधारकांना ऑनलाइन घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांचा भरणा करण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करता येईल. नागरिकांच्या सोयीकरीता करांचा भरणा करणेसाठी नगरपरिषद कार्यालयामधील ग्राहक सुविधा केंद्र व कर संकलन केंद्र कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी देखील चालू राहणार आहे. तरी करांचा भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे व विकास कामात आपले बहुमोल योगदान द्यावे व कारवाई टाळावी असे, आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले आहे.
बारामती नगरपरिषदेची कर वसुलीसाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:11 AM