‘छत्रपती’ला पुर्वीचे दिवस आणायचे आहेत,बाकी यामध्ये वैयक्तीक आमचा ‘इंटरेस्ट’ नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:46 IST2025-04-06T18:44:14+5:302025-04-06T18:46:20+5:30
आपला प्रपंच नीट चालविण्याची गरज आहे.काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील.

‘छत्रपती’ला पुर्वीचे दिवस आणायचे आहेत,बाकी यामध्ये वैयक्तीक आमचा ‘इंटरेस्ट’ नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती - श्री छत्रपती कारखान्याचे पृथवीराज जाचक यांनी पुढे पाच वर्ष नेतृत्व करायचं आहे.पाच वर्षात त्यांनी ‘छत्रपती’ माळेगांव,सोमेश्वरच्या बरोबरीने आणावा.उद्यापासुन वेगवेगळ्या अफवा उठतील.काय राव बापुंच आणि दादाचं जुगांड जमलं का काय,काही जुगाड बिगाड जमलेलं नाही.आपल्या पुर्वजांनी हे उभारलेलं वैभव आहे.आपल्याला पुर्वीचे दिवस आणायचे आहेत. बाकी यामध्ये वैयक्तीक आमचा ‘इंटरेस्ट’ नाही.आपला प्रपंच नीट चालविण्याची गरज आहे.काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील.
हि निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुक बिनविरोध होण्याचे संकेत दिले. भवानीनगर येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले,जाचक यांना पुढे कारखाना नेतृृत्व करायचे आहे.त्यासाठी शासन पातळीवर समस्या मार्गी लावण्यासाठी माझ्याह दत्तामामा भरणे यांचे नेहमीच सहकार्य राहिलं.यामध्ये पुर्वीचे राजकीय मतभेद आणले जाणार नाहीत.
लवकरात लवकर कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वस्व पणाला लावू,सगळे मिळुन पुर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी एकमेकांना साथ देवु, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आपल्या वडीलधार्यांनी सोननाणं मोडुन मोठ्या कष्टाने उभा केला.कारखाना नावारुपाला आणला.शिक्षण संस`था काढुन सभासदांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली.मात्र, कारखान्याची अवस`था पाहता मागे वळुन पाहिल्यास मनाला वेदना होतात,मन खिन्न होतं. सहकारी साखर कारखानदारी अडचणीतून वाटचाल करीत आहे.
मात्र,इतर निवडणुकांमध्ये चुक झाल्यास केवळ विकासकामांवर परीणाम होतो.मात्र,सहकारात दुध संघ,कारखाना कारभारात योग्य मॅनेजमेंट न झाल्यास सभासदांना किंमत मोजावी लागते.‘छत्रपती’मध्ये गेल्या दहा वर्षाच्या काळात नेमके हेच घडले.राज्यात पाच वर्ष आपलं सरकार स`थिर आहे.केंद्रात मोदी सरकार मजबुत आहे.केंद्रीय मंत्री अमित शहांमुळे कारखान्यांवरील ‘इन्कम टॅक्स’ची टांगती तलवार दुर होवून दहा हजार कोटींपेक्षा अधिकचा फायदा शेतकर्यांना झाला.काही कारखाने केवळ सलाइनवर जीवंत आहेत.तीच अवस`था ‘छत्रपती’ची आहे.म्हणुन समजून सांगण्यासाठी आज आलो आहे.माझा परीवाराचा ४००० टन ऊस जातो,त्यामुळे मी २८ लाख रुपये कमी घेतले.माळेगांव,सोमेश्वरपेक्षा ५०० ते ७०० रुपये कमी घेतले.माझा व्याप वाढला आहे,बोर्डात असतो तर सुतासारखं एकएेकाला सुतासारखं सरळ केला असतं.मागील निवडणुकीच्या वेळी घसे कोरडे केला.भाव चांगला देवु,चांगल्या पध्दतीने नोकरभरती करण्याचे आश्वासन दिले.काय झालं दहा वर्षात त्या नोकरभरतीचं तर वझंवाटोळं करुन टाकलं.कारखान्यावर १७८ कोटी कर्जाचा बोजा असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणले.
यावेळी क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,शेतकर्यांच्या प्रपंचाच्या दृष्टीने हि निवडणुक महत्वाची आहे.त्यामुळे राजकीय जोडे बाजुला ठेवुन कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.पृथवीराज जाचक यांनी चांगला निर्णय घेतला,या निर्णयाचे स्वागत असल्याचे भरणे म्हणाले.शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथवीराज जाचक म्हणाले,उपमुख्यमंत्री अजित पवार,क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वात आजची एेतिहासिक सभा पार पडत आहे.निवडणुक म्हणजे भांडण नाही.संस`था चांगली चालावी,शेतकरी,कामगारांना चांगले उत्पन्न मिळावे हिच सर्वांची सदिच्छा आहे.‘छत्रपती’ संकटातून बाहेर काढण्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नसल्याचा निर्धार जाचक यांनी व्यक्त केला.यावेळी अध्यक्ष प्रशांत काटे,उपाध्यक्ष अमोल पाटील,राजवर्धन शिंदे,मुरलीधर निंबाळकर आदी उपस`थित होते.प्रास्तविक शिवाजी निंबाळकर यांनी तर आभार विशाल निंबाळकर यांनी मानले.
...‘छत्रपती’च्या राजकारणात ट्वीस्ट
शेतकरी कृती समितीच्या वतीने पृथवीराज जाचक यांनी कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देण्याचे नियोजन करण्यात आले होते.मात्र,शनिवारी (दि ५) रात्री पवार आणि जाचक यांच्यात महत्पवुर्ण बैठक पार पडली.यामध्ये पवार यांनी राजकीय वैर संपवत जाचक यांच्याशी हातमिळवणी केली.त्यामुळे तालुक्यातील राजकारण बदलाचे संकेत आहे.तालुक्यात पवार जाचक पर्व नव्याने सुरु झाल्याचे चित्र आहे.