शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

‘छत्रपती’ला पुर्वीचे दिवस आणायचे आहेत,बाकी यामध्ये वैयक्तीक आमचा ‘इंटरेस्ट’ नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:46 IST

आपला प्रपंच नीट चालविण्याची गरज आहे.काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील.

बारामती  -  श्री छत्रपती कारखान्याचे पृथवीराज जाचक यांनी पुढे पाच वर्ष नेतृत्व करायचं आहे.पाच वर्षात त्यांनी ‘छत्रपती’ माळेगांव,सोमेश्वरच्या बरोबरीने आणावा.उद्यापासुन वेगवेगळ्या अफवा उठतील.काय राव बापुंच आणि दादाचं जुगांड जमलं का काय,काही जुगाड बिगाड जमलेलं नाही.आपल्या पुर्वजांनी हे उभारलेलं वैभव आहे.आपल्याला पुर्वीचे दिवस आणायचे आहेत. बाकी यामध्ये वैयक्तीक आमचा ‘इंटरेस्ट’ नाही.आपला प्रपंच नीट चालविण्याची गरज आहे.काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील.हि निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुक बिनविरोध होण्याचे संकेत दिले. भवानीनगर येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले,जाचक यांना पुढे कारखाना नेतृृत्व करायचे आहे.त्यासाठी शासन पातळीवर समस्या मार्गी लावण्यासाठी माझ्याह दत्तामामा भरणे यांचे नेहमीच सहकार्य राहिलं.यामध्ये पुर्वीचे राजकीय मतभेद आणले जाणार नाहीत.लवकरात लवकर कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वस्व पणाला लावू,सगळे मिळुन पुर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी एकमेकांना साथ देवु, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आपल्या वडीलधार्यांनी सोननाणं मोडुन मोठ्या कष्टाने उभा केला.कारखाना नावारुपाला आणला.शिक्षण संस`था काढुन सभासदांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली.मात्र, कारखान्याची अवस`था पाहता मागे वळुन पाहिल्यास मनाला वेदना होतात,मन खिन्न होतं. सहकारी साखर कारखानदारी अडचणीतून वाटचाल करीत आहे.मात्र,इतर निवडणुकांमध्ये चुक झाल्यास केवळ विकासकामांवर परीणाम होतो.मात्र,सहकारात दुध संघ,कारखाना कारभारात योग्य मॅनेजमेंट न झाल्यास सभासदांना किंमत मोजावी लागते.‘छत्रपती’मध्ये गेल्या दहा वर्षाच्या काळात नेमके हेच घडले.राज्यात पाच वर्ष आपलं सरकार स`थिर आहे.केंद्रात मोदी सरकार मजबुत आहे.केंद्रीय मंत्री अमित शहांमुळे कारखान्यांवरील ‘इन्कम टॅक्स’ची टांगती तलवार दुर होवून दहा हजार कोटींपेक्षा अधिकचा फायदा शेतकर्यांना झाला.काही कारखाने केवळ सलाइनवर जीवंत आहेत.तीच अवस`था ‘छत्रपती’ची आहे.म्हणुन समजून सांगण्यासाठी आज आलो आहे.माझा परीवाराचा ४००० टन ऊस जातो,त्यामुळे मी २८ लाख रुपये कमी घेतले.माळेगांव,सोमेश्वरपेक्षा ५०० ते ७०० रुपये कमी घेतले.माझा व्याप वाढला आहे,बोर्डात असतो तर सुतासारखं एकएेकाला सुतासारखं सरळ केला असतं.मागील निवडणुकीच्या वेळी घसे कोरडे केला.भाव चांगला देवु,चांगल्या पध्दतीने नोकरभरती करण्याचे आश्वासन दिले.काय झालं दहा वर्षात त्या नोकरभरतीचं तर वझंवाटोळं करुन टाकलं.कारखान्यावर १७८ कोटी कर्जाचा बोजा असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणले.यावेळी क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,शेतकर्यांच्या प्रपंचाच्या दृष्टीने हि निवडणुक महत्वाची आहे.त्यामुळे राजकीय जोडे बाजुला ठेवुन कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.पृथवीराज जाचक यांनी चांगला निर्णय घेतला,या निर्णयाचे स्वागत असल्याचे भरणे म्हणाले.शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथवीराज जाचक म्हणाले,उपमुख्यमंत्री अजित पवार,क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वात आजची एेतिहासिक सभा पार पडत आहे.निवडणुक म्हणजे भांडण नाही.संस`था चांगली चालावी,शेतकरी,कामगारांना चांगले उत्पन्न मिळावे हिच सर्वांची सदिच्छा आहे.‘छत्रपती’ संकटातून बाहेर काढण्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नसल्याचा निर्धार जाचक यांनी व्यक्त केला.यावेळी अध्यक्ष प्रशांत काटे,उपाध्यक्ष अमोल पाटील,राजवर्धन शिंदे,मुरलीधर निंबाळकर आदी उपस`थित होते.प्रास्तविक शिवाजी निंबाळकर यांनी तर आभार विशाल निंबाळकर यांनी मानले....‘छत्रपती’च्या राजकारणात ट्वीस्टशेतकरी कृती समितीच्या वतीने पृथवीराज जाचक यांनी कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देण्याचे नियोजन करण्यात आले होते.मात्र,शनिवारी (दि ५) रात्री पवार आणि जाचक यांच्यात महत्पवुर्ण बैठक पार पडली.यामध्ये पवार यांनी राजकीय वैर संपवत जाचक यांच्याशी हातमिळवणी केली.त्यामुळे तालुक्यातील राजकारण बदलाचे संकेत आहे.तालुक्यात पवार जाचक पर्व नव्याने सुरु झाल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र