शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

विहिरीचे काम सुरू असताना रिंग पडून चार मजूर गाडल्याची भीती; इंदापूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 8:00 AM

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंग आणि मुरुम ढासळून त्याखाली  चार मजूर अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे .

बारामती- इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंग आणि मुरुम ढासळून त्याखाली  चार मजूर अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे . पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,मंगळवारी (दि १)रात्री  ९ च्या  सुमारास ही घटना घडली. विजय अंबादास क्षीरसागर(रा. सणसर, ता. इंदापूर, जिल्हा. पुणे यांचे मौजे म्हसोबावाडी) गावचे हद्दीत कवडे वस्ती लगत जमीन गट नंबर ३३८मध्ये विहिरीचे रिंग बांधकाम सुरू होते.

यावेळी  विहिरीमध्ये रिंग पडून व मुरूम ढासळून  सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय.३५ वर्ष),जावेद अकबर मुलानी(वय. ३५ ), परशुराम बन्सीलाल चव्हाण(वय ३० वर्ष) मनोज मारुती सावंत( वय ४० वर्षे, सर्व रा. बेलवाडी, ता.इंदापूर, जि. पुणे )हे गाढले गेले आहेत. सदरची विहीर ही १२० फुट व्यासाची (गोल) व १२७ फुट खोल आहे.

गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही, चौकशीदरम्यान करतोय नारेबाजी

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,तहसिलदार  श्रीकांत पाटील  हजर आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोकलेन मशीन लावून  विहिरीचे डासाळलेला मुरूम काढण्याचे काम चालू आहे. मुरूम काढून कामगार बाहेर काढण्याचे काम चालू आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती