बारामती: २०१९ मध्ये विधानसभा व लोकसभेसाठी झालेल्या मतदानासह, तसेच कोरोना प्रादुर्भाव काळात केलेल्या कार्याद्दल माजी सैनिकांचा पोलिसांच्या वतीने गौरव करण्यात आाला.
पोलिसांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन दिवस-रात्र सहभागी होत स्वेच्छेने नि:स्वार्थपणाने माजी सैनिकांनी ६० दिवस सहकार्य केले. अविस्मरणीय असा राज्यात पहिला बारामती मिलिट्री पॅटर्न राबविला. त्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुणे ग्रामीण कार्यालयाच्या वतीने अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या वतीने ५० माजी सैनिकांना संघटनेला प्रशंसापत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी आजी-माजी सैनिक व परिवारांचा आदर करण्याचे आश्वासन दिले. जय जवान आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी सचिव राहुल भोईटे, कार्याध्यक्ष भारत जाधव, खजिनदार नामदेव सायार, नगरपालिकेतील अतिक्रमण अधिकारी संतोष तोडकर, रमेश रणमोडे, रवींद्र लडकत, शिवनिंगा माळी, अभय भोरात, विलास कांबळे, भारत मोरे, बाळासाहेब तावरे, बिभीषण वणवे, बापू भापकर, अभय निंबाळकर,दिलीप चौधरी आदी आजी माजी सैनिक उपस्थित होते.
आजी माजी सैनिकांचा सत्कार करताना मिलिंद मोहिते, नारायण शिरगावकर, नामदेव शिंदे आणि अन्य.
२५०८२०२१-बारामती-१९