शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

बारामती पोलिसांचा इंदापूरच्या तोतया पत्रकाराला दणका; चार लाखांच्या फसवणुक प्रकरणी अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 5:33 PM

ऑनलाईन चारचाकी खरेदी प्रकरण; साथीदार महिला फरार

बारामती : इंदापूर येथील तोतया पत्रकारालाबारामतीपोलिसांनी दणका दिला आहे. ऑनलाईन चारचाकी खरेदी प्रकरणी उमरज (ता. कºहाड) येथील व्यक्तीची चार लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी या तोतया पत्रकारालापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याची साथीदार महिला फरार झाली आहे.

अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मच्छिंद्र कदम (वय ३१, मूळ रा. काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, सध्या रा. देसाईवस्ती, बेलवाडी, ता. इंदापूर) असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याच्यासोबत प्रियांका पांडूरंग जाधव (रा. एमआयडीसी, बारामती) हिच्यावरही फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ती सध्या फरार आहे. याबाबत मंगळवारी (दि. १७) बारामती शहर पोलिस ठाण्यात  पत्रकार परिषद पार पडली. यावेळी  उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यावेळी उपस्थित होते.

याप्रकरणी वैभव सदाशिव लाटे (रा. भवानीपेठ, उमरज, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. ५ ऑगस्ट रोजी फिर्यादीने ओएलएक्स अ‍ॅपवर जुनी कार खरेदीसाठी जाहिरात पाहिली. त्यानुसार एक मोटार त्यांना पसंत पडली. दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क केला असता महेश कदम हे त्यांच्याशी बोलले. कदम याने स्वत: पत्रकार-संपादक असल्याचे सांगितले. तुम्ही बारामतीत प्रत्यक्ष येवून मोटार पहा असे त्याने सांगितले. त्यानुसार दि. १३  ऑगस्ट रोजी फिर्यादी हे भाऊ डॉ. विक्रांत, मित्र राजकुमार जाधव यांच्यासह बारामतीत आले. यावेळी कदम यांनी बारामती बसस्थानकासमोर त्यांची भेट घेत मोटार दाखवली. मोटारीतून शहरातून फेरफटका मारला. मोटारीची कागदपत्रे पाहिली असता ती प्रियंका पांडूरंग जाधव (रा. वरलेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या नावे दिसून आले. ती माझी पत्नी असून तिच्या लग्नापूर्वीच्या नावावर मोटार असल्याचे त्याने सांगितले. पाच लाख रुपयांत मोटारीचा व्यवहार ठरला. त्यातील चार लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर एक लाख रुपये मोटारीची एनओसी ताब्यात मिळाल्यावर देण्याचे ठरले. त्यानुसार भिगवण रस्त्यावरील स्टेट बँकेतील शाखेतून जाधव यांच्या खात्यात फिर्यादीने चार लाख रुपये पाठवले. नोटरी करण्यासाठी ते एका ठिकाणी थांबले असताना कदम हा घरी जावून पत्नीला घेवून येतो असे सांगून गेला. तो परत आलाच नाही. त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधल्यावरही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर  पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत तातडीने हालचाल केली. महेश कदम याला अटक केली.

पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, बापू बनकर, दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, सुनील कोळी, चैतन्य पाटील यांनी ही कामगिरी केली. कदम याच्याकडे चार लाख रुपयांबाबत विचारणा केली असता बँकेतून त्याने ही रक्कम काढल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या गुन्ह्यानंतर लागलीच दुसºया दिवशी त्याने स्विफ्ट मोटार विकणे असल्याची जाहिरात ओएलएक्सवर केली होती.----------------------------

नागरिकांनी ऑनलाईन खरेदी-विक्री करताना काळजी घ्यावी. महेश कदम या तोतया पत्रकाराने प्रियांका जाधव या महिलेच्या साह्याने बारामती परिसरात अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता आहे. या प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा.- मिलींद मोहिते अप्पर पोलिस अधिक्षक, बारामती

टॅग्स :IndapurइंदापूरBaramatiबारामतीJournalistपत्रकारPoliceपोलिसArrestअटक