बारामती - जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामतीनगरी सज्ज झाली आहे. नगरपालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याच्या विसाव्यासाठी शारदा प्रांगणामध्ये भव्य मंडप उभारला आहे. शुक्रवारी पालखी सोहळा मुक्कामासाठी बारामतीत विसवणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पालखी सोहळा शारदाप्रांगण येथे विसवणार आहे. तत्पुर्वी नगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या वतीने पाटस रस्त्यावरील पांढरीचा महादेव याठिकाणी पालखी सोहळ््याचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर पालखी सोहळा तांदुळवाडी वेस व कचेरी रस्ता मार्गे भिगवण चौक येथे दाखल होणार आहे. नगरपालिकेच्या वतीने शारदा प्रांगण येथे उभारलेल्या भव्य मंडपाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच वारकरी भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठाही टँकरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पालखी सोहळ््यासाठी शासनाकडून ५०० फिरती स्वच्छतागृहे देण्यात आली आहेत. संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनीक स्वच्छतागृहे, मुताºया आदी ठिकाणी जंतनाशक पावडरची फवारणी तसेच धुर फावारणी करण्यात येत आहे. कचरा टाकण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी ३०० कचरा पेट्या ठेवण्यात येणार आहेत.पालखी सोहळ््यात सहभागी होणाºया भाविकांनी कचरा रस्त्यावर न टाकता कचरा पेट्यांमध्ये टाकावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. वारकरी भाविकांच्या स्नानासाठी नगरपालिकेने बाजार समिती व शारदा प्रांगण येथे १०० शॉवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पालखी सोहळ््यानिमित्त शहरातील मटण मार्केट तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.पालखी सोहळा शहरात विसवणार असल्याने शहरांगर्तत सर्व वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौकातील पार्किंग बंद करण्यात आली आहेत. उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने वारकरी भाविकांवर मोफत औषोधोपचार करण्यात येणार आहेत. शहरातील सर्व हॉटेल व्यावसाईक, दुकानदार यांना प्लॉस्टिक न वापण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. बारामती नगरपालिका, महसुल विभाग, पोलिस प्रशासन, बांधकाम विभाग, उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समिती आदींनी कंबर कसली आहे.पालखी सोहळ््यानिमित्त शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू यासाठी पोलिस कर्मचाºयांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी यवत मुक्कामी असणारे पोलिस पथक बारामती येथे बंदोबस्तासाठी असणार आहे. आम्ही वरिष्ठांकडे १५० पोलिस कर्मचाºयांची मागणी केली आहे.- अशोक धुमाळपोलीस निरीक्षक,बारामती शहर पोलीस ठाणेनगरपालिकेच्या कर्मचाºयांसोबत समन्वय ठेवून बारामती येथील सजग नागरिक मंचाच्या वतीने स्वच्छतेबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. शहरात पालखी काळात कोणत्या ठिकाणी किती स्वच्छतागृहे लावायची, या स्वच्छतागृहांमध्ये पाणी, वीज यांची सोय करून देण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाºयांसह सजग नागरिक मंचाचे सुमारे ४०० स्वयंसेवक मेहनत घेणार आहेत. हे स्वयंसेवक स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी वारकरी भाविकांची प्रबोधन करणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी रात्रभर स्वयंसेवर सेवा देणार आहेत.पालखी मार्गावरील ७७ गावांमध्ये प्रबोधनबारामती : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या वतीने पालखीमार्गावरील ७७ गावांमध्ये पर्यावरण व प्लॅस्टिकबंदीबाबत समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येईल. महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्याद्वारे प्लॅस्टिकबंदी, थार्माकॉल बंदी, पाणी वाचवा, बेटी बचाव, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आदी विषयांवर ग्रामस्थांचे प्रबोधन करणार आहेत.काटेवाडीत धोतरांच्या पायघड्यांनी होणार स्वागतकाटेवाडी : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी काटेवाडीकर सज्ज झाले आहेत. धोतरांच्या पायघड्या अंथरून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच, शनिवारी (दि. १४) पालखी सोहळ्यातील पहिले रथाभोवती मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण पार पडेल. गावच्या वेशीवरून पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात नेण्यात येते. ठिकठिकाणी स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत.पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता, परिसरातील विहिरीतील शुद्धीकरण, पालखी सोहळ्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी येथे विसावतो.सोहळ्यातील वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच सोहळ्याच्या स्वागतात उणीव राहू नये, यासाठी सुनेत्रा पवार लक्ष ठेवून आहेत. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग, वीजवितरण विभागासह ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर व सोहळा पुढील मुक्कामी गेल्यावर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.पालखी सोहळ्याचे जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यापासून विविध ठिकाणी संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराम महाराजांसोबतच संत सोपानकाकांची पालखीचे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात येत आहे. यासोबतच गावोगावाहून विविध संतांच्या पालख्याही पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. श्री विठ्ठलाच्या दिशेने झपाझप पावले टाकत निघालेल्या वारकºयांच्या मुखातून ‘विठ्ठल-विठ्ठल’ हा एकमेव नाद कानी पडत आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये भक्तिमय आणि विठ्ठलमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायल मिळत आहे.काटेवाडीत पार पडणार मेंढ्यांचे गोल रिंगण; प्रांताधिका-यांकडून पाहणीकाटेवाडी : संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांचा मेळा काटेवाडीत दि. १४ रोजी विसाव्यासाठी दाखल होत आहे. या सोहळ्यातील पहिले मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गोल रिंगण पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी काटेवाडी रिंगणस्थळासह दर्शनमंडप परिसराची पाहणी केली.स्वच्छता, ग्रामपंचायत प्रशासनाची लगबग पाहून कौतुक केले. प्रांत अधिकारी निकम यांनी धोतराच्या पायघड्या अंथरून पालखीरथ ग्रामस्थांद्वारे गावात आणला जातो त्या मार्गाची पाहणी करून गर्दीबाबत करावयाची उपाययोजना यासंबंधी संरपच विद्याधर काटे व ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. या मार्गांवरील वीजवितरण तारांशी काही वृक्षांच्या फांद्या पासआऊट झाल्या आहेत त्या काढण्याची सूचना वीजवितरण विभागाला दिल्या. वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गावातील विद्युत रोहित्र रस्त्याच्या कडेला आहे.त्याला तातडीने संरक्षणजाळी गार्डच्या उपाययोजना करण्याबाबत वीजवितरण अधिकारी लटपते यांना सूचना केली. काटेवाडीची राज्यात वेगळी ओळख आहे. हे गाव पाहण्यासाठी वैष्णवाचा मेळा मोठ्या प्रमाणात गावात विसावतो. सुनेत्रा पवार यांनी याबाबत सूचना दिल्या असून तयारी पूर्ण झाल्याचे संरपच विद्याधर काटे यानी सांगितले. या वेळी तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक विठ्ठल तबडे, मंडलाधिकारी एस. एस. गायकवाड, पोलीस पाटील सचिन मोरे, संभाजी बिग्रेडचे माजी अध्यक्ष अमोल काटे, दत्तात्रय काटे, तलाठी भुसेवाड, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, सतीश गायकवाड, ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारीसह व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालखीच्या स्वागतासाठी बारामती सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:03 AM