जानेवारी महिन्यात सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. त्यानंतर या निवडणुका ९ व १० फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु सरपंच आरक्षणाविरोधात शिक्रापूर ग्रामपंचायत काही जण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते.
त्यामुळे या निवडणुका १६ फेब्रुवारीपर्यंत रोखण्यात आल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
यामध्ये तक्रारदार यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांनी फेटाळल्यानंतर हायकोर्टातून ही याचिका ही बरखास्त करण्यात आली.
त्यानंतर १७ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या निवडणुका २४ फेब्रुवारी व २५ फेब्रुवारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु सरपंचपदाच्या निवडणुका कधी, याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती.
परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून सरपंचपदाच्या निवडणुका जाहीर केल्या आहे. यासाठी शिरूरच्या तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून मंडळ अधिकारी व अधिकारी यांची सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १८५८ चे कलम ३० व ३३ नुसार सरपंच, उपसरपंचपदाचे कामकाज करावे, तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार हे कामकाज चालविण्यात यावे, अशा सूचना तहसीलदार व जिल्हा परिषदेला दिल्या आहेत.