शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

बारामती सलग दुसऱ्या वर्षी ‘अस्वच्छ’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:36 AM

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या स्पर्धेत बारामती शहर सलग दुसऱ्या वर्षी ‘अस्वच्छ’ ठरले आहे.

- रविकिरण सासवडे बारामती : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या स्पर्धेत बारामती शहर सलग दुसऱ्या वर्षी ‘अस्वच्छ’ ठरले आहे. राज्यातील एकलाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीतील ९९७ शहरांमध्ये बारामती ३२५ व्या निचांकी स्थानावर बारामती फेकली गेली आहे. मात्र, या सर्वेक्षणामध्ये सर्टिफिकेशन या प्रकारामध्ये ओडीएफचे १५० गुण व २ स्टारचे ३५० गुण न धरल्याने बारामतीला हा फटका बसला आहे, असा दावा मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.जिल्ह्यात इंदापूर, सासवड, भोर, जेजुरी, तळेगाव दाभाडे आणि दौंड आदी शहरे बारामतीपेक्षा वरचढ ठरली आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत सलग दुसºयावर्षी बारामती निचांकी पातळीवर घसरली आहे. या स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बारामती शहराच्या ‘अस्वच्छतेचा’ मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजकीय अस्पृश्यतेमुळे मुल्यांकनात बारामतीला फटका बसल्याचा आरोप नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी केला आहे. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात विविध विभागांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा घेण्यात आली. एक लाखापेक्षा कमी व त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा स्वतंत्र गटात समावेश करण्यात आला. तसेच पुर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि उत्तर-पुर्व असे पाच झोन करण्यात आले होते. राज्य पातळीवर एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ९९७ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये बारामती शहर ३२५ व्या क्रमांकावर राहिले आहे. सर्वेक्षणातील एकुण ५ हजार गुणांपैकी बारामतीला २ हजार ५२७ गुण मिळाले आहेत.या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या कराड शहराला सुमारे ४ हजार ६३ गुण आहेत. तसेच सासवड, इंदापूर, भोर, जेजुरी, तळेगाव दाभाडे, दौंड ही बारामतीपेक्षा तुलनेने कमी विकसित शहरेही पुढे गेली आहेत. बारामती शहरातील रस्ते, शहराचे नियोजन, रिंग रोड, शहरातील कचरा गोळा करणे, स्वच्छता तसेचइतर बाबतीतील विकासाची स्थिती तुलनेने चांगली आहे. राजकारणाचे पॉवर ग्रीड असलेले शहर विकासाच्या बाबतीतही पुढे असल्याने अनेकांना भुरळ पडते. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील क्रमवारी न पटणारी असल्याची चर्चा बारामतीकरांमध्ये सुरू झाली आहे.> बारामतीच्या नावाची राज्यकर्त्यांना अ‍ॅलर्जी : किरण गुजरयाविषयी ‘लोकमत’ शी बोलताना ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर म्हणाले, बारामती शहर कचराकुंडीमुक्त आहे. कचरागाड्या प्रत्येक घरी कचरा गोळा करण्यासाठी पोहचतात. शहर १०० टक्के हगणदारी मुक्त आहे. मात्र, बारामती शहराला राजकीत अस्पृश्यतेचा फटका बसत आहे. बारामतीच्या नावाची अ‍ॅलर्जी सध्याच्या शासनाला आहे. परिणामी बारामतीचे स्टार मानंकनातील हक्काचे ३५० गुण दिले गेले नाहीत. तसेच ओडीएफचे १५० असे ५०० गुण दिले नाहीत. बारामती शहराती १८ पटीने हद्दवाढ झाली. तीन वर्षांपूर्वी बारामती नगरपरिषद ‘अ’ वर्गामध्ये आली. बारामती शहर हगणदारीमुक्त, कचराकुंडी मुक्त तसेच भूमीगत गटारी या गोष्टी या मुल्यांकनामध्ये विचारातच घेतल्या गेल्या नाहीत. ४.६४ किलोमिटर हद्दीसाठी असणारे फक्त ६५ सफाई कामगार आपल्याकडे आहेत.मात्र, शहराची हद्द वाढ देखील १८ पटींनी झाली आहे. ५५ चौरस किलोमिटरहद्द झाली आहे. त्यामानाने हे सफाई कामगार कमी आहेत. राज्य शासनाने बारामती नगरपरिषदेचा ‘अ’ वर्गाचा आकृतीबंद अद्याप मंजुर केला नाही. हा आकृतीबंद मंजुर झाल्यास कायमस्वरूपी ३०० सफाई कामगार बारामती नगरपरिषदेकडे उपलब्ध होऊ शकतात.बारामती शहराच्या आजूबाजूच्या वस्त्यांची लोकसंख्या अधिकआहे. या लोकसंख्येचे समावेश शहरातील लोकसंख्येमध्ये धरला जात नाही. मात्र नगरपरिषदेलाच या लोकसंख्येला सर्व सुविधा पुरवाव्या लागतात. ही लोकसंख्या जवळपास तीन पटआहे. बारामती नगरपरिषदेकडून पाठवलेल्या वेगवेगळ््या प्रस्तावांना बगल दिली जाते. लवकर मंजुरी मिळत नाही. एखादे काम नगरपरिषदेने हाती घेतले की स्थानिक विरोधक विरोधासाठी विरोध करतात. ‘बारामती पॅटर्न’ला मुद्दम धक्का लावण्याचा केविलवाना प्रयत्न केला जात आहे. मात्र घसरलेले मुल्यांकनावर विचार करून अधिकाधिक सुधारणा करण्याचा नगरपरिषदेकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.>गुणांकनाची फेरतपासणी करण्याची मागणी...सर्टिफिकेशनमधील गुणांकनाची फेरतपासणी करण्याची मागणी राज्या अभियान संचालक यांच्याकडे मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी तर प्रधान सचिवांकडे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी पत्राद्वारे केली आहे. मुख्याधिकारी योगेश कडुसकर म्हणाले, बारामती नगरपरिषदेला राज्य शासनाकडून १४ डिसेंबर २०१८ ला ०२ स्टार मानांकन प्राप्त झाले होते. त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षण २०१९ करीता ३ स्टार मानांकनाकरीता सहभाग घेतला होता. तसेच बारामती शहर १०० टक्के हगणदारीमुक्त असून त्याबाबतचा प्रस्ताव ‘ओडीएफ’ व ‘ओडीएफ’ प्लस पहाणीसाठी स्वच्छ भारत पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड केला होता. परंतू या स्पर्धेतील पार्ट-२ मध्ये असणाºया सर्टिफिकेशनमध्ये बारामती नगरपरिषदेस केवळ २५ गुण मिळाले. प्रत्यक्षात बारामती नगरपरिषदेस २ स्टारचे ३५० व ओडीएफचे १५० असे ५०० गुण मिळणे अपेक्षीत होते.>कराड आघाडीवरस्वच्छ सर्वेक्षणात पश्चिम विभागामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून कराडने पहिला क्रमांक मिळवला आहे. कराड शहराला ४ हजार ६३ गुण मिळाले आहेत. बारामती नगरपरिषदेस नागरिकांना सेवा देण्याच्या प्रकरात ५७४, सर्टिफिकेशनमध्ये २५ तर थेट निरिक्षणामध्ये ९९९ गुण मिळाले आहेत. तर नागरिकांचा प्रतिसाद या प्रकारातील गुण जाहिर केले नसल्याचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी सांगितले. या यादीमध्ये इंदापूर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापनात पश्चिमविभागात पहिला क्रमांक मिळालाआहे. इंदापूर नगरपरिषदेस ३ हजार ७५२ गुणांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ सासवड, भोर, जेजुरी, तळेगाव दाभाडे,दौंड शहरांचा क्रमांक लागला आहे.