शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
4
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
5
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
6
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
7
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
8
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
9
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
10
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
11
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
12
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
13
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
14
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
15
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
16
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
17
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
18
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
19
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

बारामती: चोरीला गेलेल्या सुमारे ३ लाख रुपये किंमतीच्या दुचाकी परत मिळविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 3:09 PM

पोलिसांनी वेषांतर करुन शिताफीने ही कारवाई केली...

बारामती (पुणे) : बारामती शहर आणि तालुका परीसरातून चोरीला गेलेल्या सुमारे ३ लाख रुपये किंमतीच्या दुचाकी परत मिळविण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वेषांतर करुन शिताफीने ही कारवाई केली.

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी तालुका परिसर, फलटण, वडगाव निंबाळकर येथे चोरी झालेल्या ३ लाख रुपये किंमतीच्या एकूण आठ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी तपास पथकास सदर चोरट्यांना लवकरात लवकर शोधून काढण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत.

त्यावरून तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय माहितीद्वारे चोरट्यांची माहिती काढली. त्यामध्ये हे चोरटे दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील आरोपी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने, वेशांतर करून, आरोपींचा मोटरसायकलवर पाटलाग करून पैगंबर उर्फ अजर तय्यब मुलानी (वय २३ ,रा. सूर्यनगरी, बारामती, मूळ रा नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर)  गणेश हनुमंत बोराटे (वय २३, रा. अवसरी, ता. इंदापूर) यांना निमगाव केतकी (तालुका इंदापूर) येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी बारामती एमआयडीसी, वडगाव निंबाळकर, फलटण येथून मोटरसायकल चोरल्याची माहिती दिली. यामध्ये दुचाकी चोरण्यासाठी आरोपी बोराटे हा मुलाणी याला मदत करीत होता. तसेच चोरीमध्ये आरोपी तय्यब मुलानी याचे चोरी करण्यात सराईत असणाऱ्या दोन मित्रांचा समावेश आहे. त्यांचा शोध तपास पथक घेत आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस हवालसदार राम कानगुडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी, संतोष मखरे यांनी केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेPoliceपोलिस