दोन महिलांची सुटका, दलाल अटक
दोन महिलांची सुटका, दलाल अटक
बारामती: बारामती एमआयडीसी परिसरात वंजारवाडी येथे तालुका पोलिसांनी एका सदनिकेत सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांची सुटका करीत एकास अटक केली आहे.
विजय नामदेव गव्हाणे (रा. माळेगाव, ता. बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना वंजारवाडीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी, कर्मचाऱ्यांनी पंचांना सोबत घेत बनावट ग्राहक तयार केला. त्याला घेऊन हे पथक वंजारवाडीच्या कुंभरकरवस्ती येथील एका सदनिकेत पोहोचले. बनावट ग्राहकाकडे दोन हजार रुपयांची एक नोट देण्यात आली. त्याचा क्रमांक टिपून घेण्यात आला. त्याला वेश्यागमनासाठी पाठविण्यात आले, त्या बनावट ग्राहकाला एका सदनिकेमध्ये दोन महिला दाखविल्यानंतर दोन हजार रुपये घेतले. बनावट ग्राहकाने पोलिसांना फोन करत इशारा दिला.यावेळी पोलिसांनी आतमध्ये जात कारवाई केल्यावर दोन महिला तेथे वेश्याव्यवसाय करत असल्याचे दिसून आले. गव्हाणे याने त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी तेथे आणले होते. यातील एक ३० वर्षीय महिला आणि दुसरी २५ वर्षीय महिला यांना त्याच्याकडे पाठविले त्यावेळी दोन्ही महिलांनी पोलिसांना सांगितले की, विजय गव्हाणे हा त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतो. त्यानुसार पोलिसांनी विजय गव्हाणे याला अटक करून तेथील साहित्य व मोबाईल असा ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
——————————————