बारामती : बारामती तालुका शिक्षक को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी दीपाली मिलन साळुंके तर व्हाईस चेअरमनपदी शिवदत्त भोईटे यांची निवड करण्यात आली.
सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेमध्ये संस्थेचे चेअरमन विशाल रामचंद्र खरात, व्हाईस चेअरमन गणेश चंद्रकांत भगत यांनी राजीनामा दिल्याने संस्थेच्या चेअरमनपदी साळुंके व व्हाईस चेअरमनपदी भोईटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेत सचिवपदी संतोषकुमार शंकर राऊत यांची फेरनिवड करण्यात आली. संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्याकरीता उपसेक्रेटरीपदी अण्णा नामदास, शफिक इनामदार व जालिंदर बालगुडे यांची फेरनिवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित साळुंके यांनी आगामी काळात जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार संस्थेचे उत्पन्न वाढवून सभासदांना जास्तीतजास्त पारदर्शक व आदर्श सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाबद्दल समाधान व आगामी काळातील कामकाजासंदर्भात योग्य त्या सूचना व मार्गदर्शन हनुमंतराव जगताप, बाळासाहेब मारणे यांनी संवाद साधला.
यावेळी शिक्षक नेते हनुमंतराव जगताप, पुणे जिल्हा प्राथ. शिक्षक संघ अध्यक्ष बाळासाहेब मारणे, राजाराम ढाळे, गेनबा आगवणे, बारामती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष अशोक माळशिकारे, राजेंद्र जगदाळे, रा. ना. जराड, सुनील घाडगे, द. ह. वीरकर, हनुमंत लोखंडे तसेच संचालक नारायण निकम, तानाजी भोसले, देविदास ढोले, दिलीपराव बारवकर, पा. ना. धायगुडे, गणेश भगत, गजानन गाढवे, रा. ना. भापकर, विशाल खरात, बाळासोा काळे, अलका रसाळ, नंदकुमार होळकर, शरद मचाले, राहुल होळकर, संजय बारवकर, दत्तात्रय बालगुडे, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब ननवरे, भरत चव्हाण, नितीन जराड, काकासाहेब साळुंके, धनसिंग भुरे, दिलीप गाडे उपस्थित होते.
दीपाली साळुंके, शिवदत्त भोईटे.
०८०७२०२१ बारामती—०१