शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Baramati | पालखी मार्गात येणारी इमारत उचलून चक्क ९ फुट मागे घेण्याचा प्रयोग; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:35 PM

ही इमारत ‘जशी च्या तशी’ पाठीमागे घेण्यात येत आहे...

काटेवाडी (बारामती) : काटेवाडी गावात संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये काटेवाडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील मासाळवाडी परिसरातील मुलाणी कुटुंबियांनी वडीलांची आठवण जपण्यासाठी चक्क दोन मजली इमारत उचलुन ९ फुट मागे सरकविण्याचा प्रयोग सुरु केला आहे.

ही इमारत ‘जशी च्या तशी’ पाठीमागे घेण्यात येत आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मुलाणी कुटुंबियांनी प्रतिकूल परस्थितीत पुर्वी आशियाना कॉम्प्लेक्स ही दुमजली वास्तु उभी केली होती. पालखी मार्गात येणारी ही दुमजली इमारत पाडण्यासाठी या कुटुंबाचे धाडस झाले नाही. कारण चार वर्षांपूर्वी अकबर मुलांणी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे या इमारतीत वास्तव्य होते. त्यांची आठवण या इमारतीत आहे. ती आठवण जतन करण्याची जिद्द मनापासून या कुंटूबाने बांधली. त्यामूळे पालखी महामार्गाला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सोशल मिडीयावर उभी इमारत आहे तशी पाठीमागे घेता येते, हे त्यांना समजले. त्यांनतर  त्याचा पध्दतीने इमारत मागे घेण्याचा निर्णय घेतला.

हरियाणातील कंपनीकडे काम-

या भागात हा पहिला प्रयोग असल्याने त्याची उत्सुकता अधिक आहे. काटेवाडीतील अकबर दादासाहेब मुलानी व हसन मुलाणी या भावंडांनी त्यांची तीन हजार फूट दुमजली इमारत चक्क ९ फूट मागे सरकविण्याचे काम सुरु केले आहे. त्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे घेतली जाणार आहे. यासाठी हरियाणा येथील मोहन लाल हाऊसिग लिप्टींग स्पिंटीग कन्ट्रक्शन कंपनी नूरबाला, पानिपत (हरियाणा )  प्रशिक्षित ठेकेदार काम करीत आहेत.

सोशल मीडियावरील व्हिडिओवरून सुचली कल्पना-

मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यातील एक हजारांहून अधिक इमारती मागे घेतल्याचा दावा केला आहे. आता काटेवाडीतील मासाळवाडी परिसरातील  हा प्रयोग सुरू आहे. यावेळी ‘लोकमत’ शी बोलताना अकबर मुलाणी यांनी सांगितले की, रस्त्यात इमारत ५ फुट जात होती. निम्म्याहून जास्त इमारत सुस्थितीत शिल्लक राहणे शक्य होते. आमची पाठीमागे स्व:तची जागा शिल्लक होती. तसेच ही इमारत पाडायला देखील मोठा खर्च येत होता. नव्याने इमारत उभी करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च येणार होता. सोशल मीडियावर हरियाणातील या पध्दतीचे काम करणाऱ्यांबाबत माहिती मिळाली. त्यांनी या सर्व इमारतीचा मागे घेण्याचा दहा लाख रुपयाहून जास्त खर्च सांगितला. इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊनच त्याचा पुर्नवापर करता येणे शक्य आहे. त्यासाठी हा पर्याय निवडला आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड