बारामती : लोकसभेप्रमाणेच देशात लक्षवेधी ठरलेली बारामती विधानसभा मतदारसंघातील काका-पुतण्याची 'हाय व्होल्टेज' लढत अखेर मतदान यंत्रात बंद झाली. मतदारसंघात पवारांच्या काैटुंबीक आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीचे रण चांगलेच तापल्याचे चित्र पाहावयास मिळाले. प्रथमच उदयास आलेली राजकीय समीकरणांचे पडसाद मतदानावर उमटल्याचे पाहावयास मिळाले. २३ नोव्हेंबरला या लढतीचा फैसला होणार आहे. २०१९ मध्ये लोकसभेचे ६८.२८ टक्के मतदान झाल्याचे चित्र होते. यंदा संपूर्ण मतदारसंघात हेच मतदान ७ १ .५ ६ झाले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मतदानात एवढी घट झाल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांपासून हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. त्याचा परिणाम सकाळच्या मतदानावर दिसून आला. सकाळी ९ पर्यंत अवघे ६.२० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत १८.८१ टक्के मतदान झाले. दुपारी १ पर्यंत ३३.७८ टक्के, ३ वाजेपर्यंत ४३.५७ टक्के मतदानाची टक्केवारी होती. ५ वाजेपर्यंत हेच मतदान ६२.३१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. त्यामध्ये १ लाख २२ हजार ५३६ पुरुष मतदारांनी, तसेच १ लाख १४ हजार ६३५ महिला मतदार,तसेच ९ तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७ १ .५ ६ टक्के मतदान झाले.दरम्यान, २०१९ च्या तुलनेने हे मतदान चांगलेच ७ १ .५ ६ आहे. त्यामुळे ७ १ .५ ६ मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, कोणाला फटका बसणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. माळेगाव येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आदींसह मतदान केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडीत मतदान केंद्रावर पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह मतदान केले. त्यांचे पुत्र जय पवार यांनी जळोची येथे मतदान केले.त्यानंतर स्वत: पवार यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार हे बारामतीत मतदारसंघात दिवसभर विविध मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी शहरातील रिमांड होम येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार, त्यांचे वडील श्रीनिवास पवार, मातोश्री शर्मिला पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. युगेंद्र पवार यांच्यासह त्यांचे वडील आणि मातोश्रींनी बारामती मतदारसंघात सर्वत्र भेट देत आढावा घेतला.दरम्यान,उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह युगेंद्र यांनीदेखील आशाताई पवार यांचे मतदानापूर्वी आशीर्वाद घेतले. आजच्या लढतीत विद्यमान आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या निकालाचे परिणाम पवार कुटुंबीयांच्या राजकारणाबरोबरच बारामतीवरदेखील उमटणार आहेत.२३ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणारबारामतीत महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाकडून आमच्या कार्यकर्ते यांना दमदाटी केल्याचा आरोप केला.येथील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेच्या मतदान केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील या आरोपानंतर या मतदान केंद्रावर पोहोचले.त्यांनी हा आरोप फेटाळला. मात्र,बारामतीच्या इतिहासात पवार कुटुंबीयांमध्ये या प्रकारचे आरोप-प्रत्याराेप झाल्याचे बारामतीकरांनी अनुभवले. प्रत्येक वेळी एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुकीला सामाेरे जाणारे या कुटुंबाने एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून बदललेले हे चित्र विधानसभेत देखील दिसून आले.
Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याची लक्षवेधी लढत ईव्हीएममध्ये बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 10:23 AM