बारामती : अतिउष्णतेने बारामती एमआयडीसीत दुचाकीने पेट घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी(दि २३) दुपारी २ च्या सुमारास घडली. येथील एमआयडीसी चौकातील शॉपिंग कॉम्लेक्ससमारे हि दुचाकी लावण्यात आली होती. दुचाकीने अचानक पेट घेतला. सुदैवाने येथील स्थानिकांनी अग्नीरोधक यंत्रणेचा वापर करुन हि आग विझवली.त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वा:स सोडला.
उन्हात लावलेल्या गाडीने अतिउष्णतेने पेट घेतला. रस्त्यावर दुचाकीने चालू असताना पेट घेतला असता तर,या चर्चेने बारामतीकर धास्तावले. सोमवारी वालचंदनगर भागात एका चारचाकी वाहनाने पेट घेतला आहे. त्यापाठोपाठ बारामतीत हि दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे अतिउष्णता जीवावर बेतण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहनांना ‘पार्किंग’ करण्यासाठी सावली शोधणार कुठे?असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
दरम्यान,बारामतीकर अतिउन्हाने होरपळुन गेले आहेत. सध्या ४० अंश सेल्सिअस तपमान असताना थेट दुचाकी, चारचाकी वाहने पेट घेण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तापमान वाढल्यास पुढे काय? या भीतीने बारामतीकर धास्तावले आहेत.